अनिकेत घमंडी,डोंबिवली: कोरोनाला हारवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे, त्यांनी घरातून बाहेर पडू नये हे योगदान महत्त्वाचे आहे. परंतु तसे होत नसल्याने डोंबिवलीतील रुग्णांमध्ये वाढच होत आहे, ते योग्य नाही. महापालिकेने सुविधा केलेल्या भागशााळेच्या भाजीबाजारात देखील प्रचंड गर्दी होत आहे. कोणीही सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होणार आहे. एक तर तो भाजी बाजार बंद करावा, अन्यथा गर्दी कमी करण्यावर नियंत्रण आणा, अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर यांनी शुक्रवारी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून ही सुविधा सुरु करण्यात आली असून त्यात नियोजनाचा अभाव असल्याने भोईर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ती सुविधा नसून गैरसोयच जास्त होत आहे. त्यासाठी सातत्याने सांगूनही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नाहीत. त्याचा त्रास सगळयांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक ऐकत नसतील तर तो बाजार महापालिकेने तातडीने बंद करावा. तसेच भागशाळा मैदान हे छोटे असून त्या ऐवजी रेल्वे ग्राऊंडमध्ये ही सुविधा निर्माण करावी, नागरिकांना दिलासा द्यावा असेही ते म्हणाले. भागशाळा असो अथवा रेल्वे ग्राऊंड येथेही होलसेल मध्ये भाजी विक्री करा, किरकोळ विक्रेते ती भाजी घेऊन जातील, आणि जेणेकरून नागरिकांना त्यांच्या प्रभागात सुविधा मिळेल असे बघावे असेही ते म्हणाले.फवारणीत पण सातत्य नाहीमहापालिकेच्या माध्यमातून जी रोग जंतू नाशक फवारणी केली जात आहे, ती योग्य नसून त्यात नियोजन दिसून येत नसल्याने भोईर यांनी नाराजी व्यक्त केली. भोईर म्हणाले की, एक दिवस प्रभागासाठी पुरत नाही. तसे असेल तर ट्रॅक्टरची योजना असावी, पण त्यामुळेही एक दिवसात फवारणी होणार नाही, किमान दोन दिवस जातीलच याचीही महापालिकेने नोंद घ्यावी. आणि आवश्यक ते बदल तातडीने करावेत असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.
डोंबिवलीत भाजीमार्केटमध्ये नागरिकांची झुंबड; काँग्रेसचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 4:48 PM