शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

वाढत्या प्रादुर्भावातही नागरिकांची बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:02 AM

कठोर कारवाईला सुरुवात : दुकानदार-ग्राहकांकडून दंडवसुली सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/जव्हार : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वसई-विरारसह जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३३ हजारच्या पुढे गेली असून आजवर ६३० जणांनी या जीवघेण्या आजारात आपले प्राण गमावले आहेत. तरीही जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांमध्ये बेफिकिरी आढळून येताना दिसत आहे. असंख्य नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. यामुळे आता प्रशासनाने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे.

पालघरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नगरपरिषदेने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार आणि ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करीत २ लाख १६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्ते व दुकानांमध्ये गर्दी होण्याची दाट शक्यता पाहता कोरोनाचा संसर्ग सर्व शहरभर वाढण्याची भीती व्यक्त करण्यातयेत आहे.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, चेहºयावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, दुकानासमोर दरपत्रक न लावणे इत्यादी प्रकरणी कठोर अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक नगरपरिषदेने केली आहे. मात्र भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, बँका आदी ठिकाणी येणाºया नागरिकांकडून आदेशाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे.नगरपरिषदेच्या वतीने पालघर रेल्वे स्थानक ते माहीम रोड, विजया बँक ते वळण नाका, मनोर रोड तेढवळे हॉस्पिटल, हुतात्मा स्तंभ ते बिडको रोड, देविशा रोड ते पृथ्वीचौक, जगदंबा हॉटेल टेंभोडे रोड ते आंबेडकर चौक आणि माहीमनोर हायवे- वीर सावरकर चौकते शिवाजी चौकपर्यंत आणि पूर्वेकडील इतरत्र भागासाठी एकूण आठ पथके नगरपरिषदेने तैनातकेली आहेत.शहरातील दुकानदार व ग्राहकांना लाउडस्पीकरच्या माध्यमातून वारंवार सूचना देऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन केले जात नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे.- उमाकांत पाटील, प्रभारी आरोग्य अधिकारी तथादंडात्मक वसुली पथकप्रमुख

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या