शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

कोरोनाच्या भयापोटी नागरिकांनी फिरवली सरकारी कार्यालयांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 12:29 AM

रेल्वे, बससेवा बंद असल्याचा परिणाम : ९० टक्के विभाग कार्यरत असूनही गर्दी रोडावली

सुरेश लोखंडेठाणे : ठाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती १५ टक्के केली असली तरी लॉकडाऊनच्या काळातही ९० टक्के कार्यालये सुरु होती. मात्र रेल्वे व परिवहन यासारख्या स्वस्त सेवा बंद असल्याने नागरिकच शासकीय कार्यालयांत कामाकाजाकरिता फिरकत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या तीन दिवसांपासून १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत १०० टक्के कार्यालयीन कामकाज करण्याचे शासन आदेश दिले आहेत. पण या आधीपासून कामकाज सुरु आहे. मात्र नागरिकच त्यांच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांत फिरकत नाहीत. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आजही ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांमधील कंटेनमेंट झोन, हॉटस्पॉटमुळे नागरिक दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकरिता बाहेर पडत असले, तरी शासकीय कार्यालयातील कामांकरिता येत नाहीत. केवळ ठाणे शहरात कंटेनमेंट झोनसह ५२ हॉटस्पॉट आहेत.

जिल्ह्यात ‘मिशन बिगिन’नुसार कामकाज सुरु झाले. पण शेजारील मुंबईत कोरोना आटोक्यात आला तरी अजून ठाणे जिल्ह्यात कोरोनाची भयानकता कायम आहे. त्यामुळे मिशन बिगिन केवळ कागदावर आहे. कारण लोक सरकारी कार्यालयांत येण्यास घाबरत आहेत. उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्याने जिल्ह्याच्या एका शहरातून ठाणे शहरात कामकाजाकरिता येणे लोकांना परवडत नाही. शहरांमधील परिवहन सेवा, एसटी बस वाहतूक बंद आहे. शासकीय कार्यालयात प्रारंभी ५ टक्के, नंतर १० टक्के आणि आता १५ टक्के कर्मचाºयांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग लॉकडाऊन उठवल्यापासून आजपर्यंत ७५ ते ९० टक्के कामकाज करीत आहेत. त्यामुळे गैरहजर कर्मचाºयांवर कारवाईचा प्रश्नच उद्भवला नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितले. परदेशातून ठाणे जिल्ह्यात येणाºयांना विमानतळावरच ताब्यात घ्यावे लागते. त्यासाठी रात्रंदिवस तहसीलदार तैनात आहेत. या परदेशी पाहुण्यांना ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदरला क्वारंटाइन करावे लागते. या ‘वंदे भारत’ योजनेकरिता ७२० प्रांत, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, तलाठी, तलाठी लिपिक तत्पर आहेत.आरटीओ कार्यालयात अगोदरच कर्मचारी कमी आहेत. मात्र, सर्व सेवा सुरु असल्याने नागरिकांची गैरसोय होत नाही. त्यामुळे गैरहजर कर्मचाºयांवर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही, असे आरटीओचे प्रशासकीय अधिकारी योगेश सांगळे यांनी सांगितले.पुरेसे कर्मचारी कार्यरत११ उपजिल्हाधिकारी, ३३ मंडल अधिकारी, १५० अव्वल कारकून, २१ तहसीलदार, २१० लिपिक, आठ लघुलिपिक, ५० नायब तहसीलदार, १११ सेवक, १२६ कोतवाल जिल्हाधिकारी कार्यालयासह ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये सेवा देत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.कार्यालयाचे काम घरातूनजिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्याही दोन ते तीन दिवसांच्या फरकाने कार्यालयीन ड्युट्या लावलेल्या आहेत. काही जण कार्यालयाचे अत्यावश्यक कामकाज घरुन करीत आहेत. आता सर्व विभागांतील बदल्या झालेले कर्मचारी त्वरित जबाबदारी स्वीकारणार आहेत.पाच लाखांचा निधी अप्राप्तजिल्हा परिषदेच्या शिक्षण, पशुसंवर्धन, कृषी वगैरे खात्यांमधील अधिकारी व कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे ‘भाऊसाहेब फुंडकर योजने’चे जिल्ह्यासाठी येणारे पाच लाख रुपये मिळवता आले नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे