ठाणे : दिवा गावातील खाडी किनारी असलेल्या गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘डी’ विभागासह ठाण्याच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या शुक्रवारी दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह पाच लाख ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील , पी. पी. घुले, सहायक दुय्यम निरीक्षक एम. टी. वरुळकर तसेच जवान एस. डी. पवार, प्रदीप महाजन आणि शैलेश कांबळे तसेच भरारी पथकाचे निरीक्षक संजय कांगणे, दुय्यम निरीक्षक सुनिल देशमुख, जवान के. एस. वाजे आणि जी. के. तेलुरे आदींच्या पथकाने २ फेब्रुवारी रोजी रोजी दिवा गावातील खाडी भागात बेकायदेशीरपणे चालणा-या गावठी हातभट्टी दारु निर्मितीच्या वेगवेगळया तीन अड्डयांवर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास धाडसत्र राबविले.
दिवा गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड: गावठी दारुसह पाच लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 7:39 PM
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे डी आणि भरारी पथकाने दिव्यातील खाडी किनारी शुक्रवारी धाड टाकून एका बोटीसह गावठी दारु तसेच दारु निर्मितीच्या रसायनासह सामुग्री जप्त केली.
ठळक मुद्दे दिवा भागातील खाडी किनारी कारवाईदारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह ५ लाख ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त१६४५ लीटर गावठी दारुसह बोटही हस्तगत