शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

शहरीकरणातून जन्मलेल्या समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 8:57 PM

ठाणे : शहरीकरणाचा वाढता वेग, त्यातून उद्भवणार्‍या नानाविध समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया या नावाने नवे सशक्त पोर्टल जनसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. विकीपीडियाच्या धर्तीवर हे पोर्टलही सर्वांसाठी खुले राहणार आहे.

ठळक मुद्देसशक्त पोर्टल जनसामान्यांसाठी उपलब्धयंत्रणेवर दबाव निर्माण करण्यास मदतसाधक-बाधक चर्चा घडवून आणणे शक्य

ठाणे : शहरीकरणाचा वाढता वेग, त्यातून उद्भवणार्‍या नानाविध समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया या नावाने नवे सशक्त पोर्टल जनसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. विकीपीडियाच्या धर्तीवर हे पोर्टलही सर्वांसाठी खुले राहणार आहे.नागरी समस्यांवर उपाय शोधणार्‍या सिटीपीडिया प्रकल्पाची माहिती देण्यासाठी लोकजागर फेस्टच्या वतीने रविवारी टाऊन हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे मतदाता जागरण अभियानचे अध्यक्ष अनिल शाळीग्राम यांनी सिटीपीडिया.नेट.इन या पोर्टलची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांसाठी या पोर्टलवर स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. विकीपीडिया सर्वांसाठी खुली आहे. या पोर्टलवर कुणालाही काहीही प्रसिद्ध करण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे ‘सिटीपीडिया’ही सर्वांसाठी खुली राहणार आहे. या पोर्टलवरही सामान्य नागरिक त्यांची मते खुलेपणाने मांडू शकणार आहेत. त्यांची मते संपादित करण्याची, त्यावर भाष्य करण्याचे अधिकार सर्वांनाच राहील, असे शाळीग्राम यांनी यावेळी सांगितले.वाढत्या शहरीकरणाने अनेक समस्यांना जन्म घातला आहे. महत्वाच्या समस्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध केल्या जातात. मात्र प्रसारमाध्यमांना मर्यादा असतात. समस्या कितीही मोठी असली तरी काही दिवसांनी ती लोकांच्या विस्मृतीत जाते. ‘सिटीपीडिया’वर अगदी लहानात लहान समस्या मांडून त्यावर साधक-बाधक चर्चा घडवून आणणे शक्य आहे. या चर्चेतून यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यास मदत होईल. ‘सिटीपीडिया’वरील प्रत्येक लेखाची जबाबदारी लेखकाची असेल. असा लेख ‘सिटीपीडिया’वर प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा त्यावर कुणालाही भाष्य करण्यापूर्वी पोर्टलवर रितसर नोंदणी करावी लागणार आहे. आरोग्य, वाहतूक, रस्ते, पाणी यासारख्या अनेक समस्या दिवसागणिक वाढत आहेत. या समस्यांवर लोकचर्चा रंगल्यास त्याद्वारे यंत्रणेवर दबाव निर्माण करणे तसेच जनमत घडविणे शक्य होते. त्यामुळे अशा प्रकारची लोकचर्चा नोकरशाही किंवा लोकप्रतिनिधी दोहोंनाही नको असते. हा मुद्दा हेरून ‘सिटीपीडिया’ने जनसामान्यांसाठी सशक्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सुरूवातीच्या काळात ‘विकीपीडिया’बाबत लोकांना संशय होता. कुणालाही काहीही लिहिण्याची किंवा कुणीही लिहिलेले संपादित करण्याची मुभा सर्वांना असल्याने ‘विकीपीडिया’ची विश्वासार्हता कितपत टिकून राहील, असा स्वाभाविक प्रश्न सर्वांपुढे होता. अल्पावधीत हा भ्रम दूर झाला आणि विकीपीडिया एक विश्वासार्ह वेबसाईट म्हणून जगप्रसिद्ध झाली. ‘सिटीपीडिया’देखील लवकरच लोकांचा विश्वास लवकरच जिंकेल असा विश्वास शाळीग्राम यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ठाणेकरांनी चर्चेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोर्टलविषयी अनेकांनी आपल्या शंका विचारल्या. शाळीग्राम यांनी त्यांचे समाधान केले.

टॅग्स :thaneठाणेcivic issueनागरी समस्या