http://www.lokmat.com/thane/thanes-tdcc-bank-not-good-repair-due-lack-cdrs/ठाणे : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे ४१ कोटी २९ लाखांचे भाग भांडवल असून त्यात १३ कोटी १३ लाखांची वाढ झाली. आॅगस्ट अखेर सहा हजार ५०४ कोटी ८३ लाखांच्या ठेवी आहेत यामध्ये चार वर्षे पाच महिन्याच्या कालावधीत दोन हजार २२८ कोटी ८१ लाख रूपयांच्या ठेवी वाढल्या आहेत. याशिवाय आॅगस्ट अखेर ३० कोटींचा नफा बँकेने मिळवलेला आहे. यामुळेच बँक सुस्थितीत असल्याचा दावा करून टीडीसीसी बँकचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केला.
‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुस्थितीत नाही’ या मथळ्याखाली लोकमतने १७ सप्टेंबर रोजी खासदार कपिल पाटील यांच्या ६० व्या सर्वसाधारण सभेतील भाषणाचा हवाला देऊन प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन पाटील यांनी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची श्रीमंत बँक म्हणून टीडीसीसी उदयाला येत असल्याचे सांगितले. २०१४ च्या ३१ मार्च अखेर बँकेचे २७ कोटी ९२ लाखाचे भाग भांडवल होते. त्यात १३ कोटी १३ लाखांची वाढ होऊन आॅगस्ट अखेर ४१ कोटी २९ लाखांचे खेळते भांडवली झाले. याप्रमाणेच तत्कालीन ६४४ कोटी ५३ लाखांच्या निधीत सुमारे साडे चार वर्षात ३०३ कोटीं १३ लाखांची वाढ होऊन आता ९४७ कोटी ६६ लाख रूपयांचा बँकेचा निधी झाला आहे.बँकेच्या ठेवी आधी चार हजार २७६ कोटी दोन लाखांच्या होत्या. त्यात दोन हजार २२८ कोटी ८१ लाखांची वाढ होऊन आता सुमारे साडे चार वर्षात सहा हजार ५०४ कोटी ८३ लाखांच्या ठेवी आहेत. बँकेने दोन हजार ८२२ कोटी ५३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. आधी ते केवळ दोन हजार २३ कोटी ५७ लाख होते. त्यामध्ये आतापर्यंत ७९९ कोटींची वाढ झाल्याचेत्यांनी सांगितले. बँकेचे खेळते भांडवल आधी केवळ पाच हजार १७७ कोटी नऊ लाख रूपये होते. त्यात दोन हजार ५७३ कोटींची वाढ होऊन बँकेचे खेळते भांडवलते आता सात हजार ७५० कोटी १८ लाख रुपये झाले आहे. सध्याचार हजार २५५ कोटी ५१ लाखांची बँकेची गुंतवणूक आहे. ती सुमारे साडे चार वर्षापूर्वी दोन हजार ६४६ कोटी ६१ लाख होती, असे पाटील यांनी नमूद केले.बँकेचा नफा सुमारे साडेचार वर्षांपूर्वी ३२ कोटी ४० लाखांचा होता. तो आता ३० कोटीं असल्याचे पाटील यांनी सांगितले. बँकेच्या सीडी रेशो मार्चअखेर ३२.३५ टक्के होता, आॅगस्ट अखेर ४३.३९ टक्के असून पाच महिन्यामध्ये बँकेच्या सीडीरेशोमध्ये ११.०४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सभासदांना मिळणाऱ्या डिव्हीडन्सच्या तुलनेत टीडीसीसी बँक देशात सर्वाधिक १५ टक्के डिव्हीडन्स सभासदांना देत असल्याचा दावाही पाटील यांनी केला........................