शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

घरगुती गणेशोत्सवात साकारली क्लस्टरविरोधाची आरास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 3:16 AM

गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असताना लाडक्या बाप्पासाठी भाविकांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटी लक्ष वेधून घेत आहेत.

ठाणे : गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असताना लाडक्या बाप्पासाठी भाविकांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटी लक्ष वेधून घेत आहेत. मात्र गावठाण, कोळीवाडे संवर्धन समितीने सुरू केलेल्या क्लस्टर योजनेच्या विरोधाचे पडसाद यंदाच्या गणेशोत्सव सजावटीमध्ये उमटले आहेत.ठाण्यातील राबोडी-कोळीवाडा गावठाण संघाचे अध्यक्ष तथा कोळीवाडा-गावठाण संवर्धन समितीचे सदस्य चंद्रकांत वैती व महेश वैती यांनी आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षातील घरगुती गणेशोत्सवात क्लस्टरविरोधाची सजावट केली आहे. विशेष म्हणजे, सजावटीतील होडी वल्हवणारा नाखवा आदी सर्व बाबी साकारण्यासाठी पर्यावरणपूरक बाबींचा वापर केला असून १० दिवसांनंतर जसे गणपती आपल्या गावी जातील तसेच क्लस्टर योजना रेटून नेणाऱ्या नेत्यांनाही या प्रतीकात्मक होडीतून गावी पाठवण्याचा अर्थात त्यांचे विसर्जन करण्याचा इशारा देखाव्याद्वारे दिला आहे.ठाण्यातील क्लस्टर योजनेतून कोळीवाडे आणि गावठाणे वगळून मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तरीही, ठाण्यातील कोळीवाड्यांमधील रहिवाशांचा क्लस्टरच्या जनसुनावणीचा फेरा कायम ठेवला. शहराच्या नियोजन आराखड्यामध्ये चेंदणी कोळीवाडा यांचा उल्लेख नाही. कोळीवाड्यांचे सीमांकन करून गावठाणांना क्लस्टरमधून वगळावे, अशी मागणी करूनही शहर विकास विभाग आणि सत्ताधारी शिवसेना दखल घेत नसल्याने कोळीबांधव आणि भूमिपुत्रांनी यापूर्वी दहीहंडीदिनी गोविंदा पथकांकडून शहरभर क्लस्टरविरोधाची हाक दिली होती.>गणेशोत्सवाच्या सजावटीत फलकांवरील घोषणाक्लस्टरला विरोध गावासाठी... आपल्यागावच्या गावपणासाठीक्लस्टर ठाण्याला लागलेले नष्टरकोळीवाडे गावठाण कायमस्वरूपीक्लस्टरमुक्त कराकोळीवाडे, गावठाण व ठाणेकरांना क्लस्टरविरुद्ध लढून स्वातंत्र्य कोण मिळवून देणार...उत्तर एकच भूमिपुत्रठाण्यातील कोळीवाड्यांना क्लस्टरमधून वगळण्याची घोषणा झाली असतानाही नागरिकांना विनाकारण बोलावून त्यांच्या सूचना आणि हरकती ऐकून घेण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. सुनावणीसाठी बोलावल्यानंतर भूमिपुत्रांच्या मुद्यांची दखल घेतली जात नाही. तेव्हा, सनदशीर मार्गाने आंदोलन छेडत असतानाच पारंपरिक उत्सवातूनही भूमिपुत्रांनी क्लस्टरविरोधाचे बिगुल वाजवले आहे.- गिरीश साळगावकर, कोळीवाडा गावठाण समिती

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव