वज्रेश्वरी : डोंबिवली येथील कुटुंबीय बुधवारी रात्री वज्रेश्वरीहून देवदर्शन करून घरी जात असताना अंबाडी नाका येथे जीपचालकाबरोबर ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. पोलिसांनी स्थानिक तरु णांनाच पोलीस चौकीत नेऊन मारहाण केल्याने संतप्त नागरिकांनी पोलीस चौकीवर दगडफेक केली. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात परस्परांवर गुन्हे दाखल केले आहेत. डोंबिवलीतील अमोल वकोडे, अजय गुजळ, किशोर धनगर, अजीन मुज्जवर हे सर्वजण वज्रेश्वरी येथे देवदर्शनासाठी आले होते. संध्याकाळी घरी परतताना अंबाडी नाका येथे जीपचालकाने रस्त्याच्यामध्ये गाडी उभी केली होती. ती बाजूला घ्यायला सांगून त्याला शिविगाळ करत मारहाण केली. पोलीस चौकीजवळ असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे स्थानिकांनी गाडीतील सर्वांना मारहाण करून गाडीचे नुकसान केले. पोलिसांनी जीपचालक आणि त्याच्या भावाला मारहाण केल्यामुळे नागरिक संतप्त झाल्याने त्यांनी पोलीस चौकीवर दगडफेक केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अंबाडी नाका येथे दोन गटात झाली हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 3:12 AM