शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
3
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
4
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
5
Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
6
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
7
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
8
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
9
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
10
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
11
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
12
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
13
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
14
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
15
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
16
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
17
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
18
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
19
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
20
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!

नागरिकांना मिळणार स्वस्तात स्वच्छ पाणी

By admin | Published: August 14, 2016 3:19 AM

शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे आणि स्वस्तात स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ठाणे महानगरपालिका आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूर्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून

ठाणे : शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे आणि स्वस्तात स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ठाणे महानगरपालिका आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूर्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून किमान ५० ठिकाणी वॉटर व्हेंडिंग मशीन उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.शुक्रवारी सायंकाळी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूर्स कॉर्पोरेशनचे समूह महाप्रबंधक अरविंद मालखेडे, गृह विभागाचे विशेष कार्य अधिकारी मालेगावकर यांनी जयस्वाल यांची भेट घेऊन याबाबतचा प्रस्ताव सादर केला. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब उपस्थित होते.इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूर्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशात विविध ठिकाणी स्वस्त दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची घोषणा नुकत्याच झालेल्या यासंदर्भात रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्येही करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर वॉटर व्हेंडिंग मशीन सर्वत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही रेल्वेने सुरू केली आहे, जेणेकरून स्टेशनवर नागरिकांना स्वच्छ पाणी स्वस्त दरात उपलब्ध होईल.या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये शहरातील गर्दीच्या एकूण ५० ठिकाणी अशी वॉटर व्हेंडिंग मशीन उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. यामध्ये सॅटीस, हॉस्पिटल, क्रीडा संकुले, नाट्यगृह आदी गर्दीच्या ठिकाणी ही मशीन बसवण्यात येणार आहेत. अतिशय अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या या मशीनमध्ये आॅनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम, थंड पाण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)या मशीनच्या माध्यमातून ३०० मिली पाणी (रिफील) १ रुपयात, तर कंटेनरसह २ रुपयांमध्ये मिळणार आहे. अर्धा लीटरची बाटली पाणी (रिफील) ३ रुपये, तर कंटेनरसह ५ रुपये, १ लीटरची बाटली (रिफील) ५ रुपये तर कंटेनरसह ८ रुपये, २ लीटरची बाटली (रिफील) ८ रुपये, तर कंटेनरसह १२ रुपये, ५ लीटर पाणी (रिफील) २० रुपये तर कंटेनरसह २५ रुपये या किमतीला पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.