कल्याण : कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथील केडीएमटीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे डेपोची दुरवस्था झाल्याकडे मनसेच्या माजी परिवहन सदस्याने लक्ष वेधले होते. त्याची तातडीने दखल शिवसेना उपशहरप्रमुख रवी पाटील यांनी घेतली होती. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर डेपोतील गवत आणि झुडपे साफ करण्यात आली आहेत.
मनसेचे माजी परिवहन सदस्य इरफान शेख यांनी वसंत व्हॅली येथील बाळासाहेब ठाकरे डेपोची दुरवस्था झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्याठिकाणी भंगार गाड्या ठेवल्या जात आहेत. तसेच डेपोभोवती गवत वाढले आहे. झुडपे वाढली आहेत. याविषयी त्यांनी आवाज उठविला होता. त्याच्या या प्रश्नाची गंभीर दखल शिवेसना उपशहरप्रमुख रवी पाटील यांनी घेतली. त्यांनी तातडीने परिवहनचे व्यवस्थापक दीपक सावंत यांना फोन करून आठ दिवसात स्वच्छता झाली पाहिजे, असा इशारा दिला होता. प्रशासनाने गवत आणि झुडपे काढली आहेत.
फोटो-कल्याण-केडीएमटी