सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एक दिवस आधीच जिल्हकयातील ठिकठकणच्या औद्याेगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआयमधील विद्याथ्यार्ंनी त्यांच्या शहरातील महत्वाच्या ठिकाणांची आज साफसफाई करून नागरिकांना स्वयंम स्वच्छतेचा संदेश दिला आहे. जिल्ह्याभरासह ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरासत टीएमटी बसच्या आवारात या विद्याथ्यार्ंनी सफाई केली आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अंबरनाथमधील विद्याथ्यार्ंनी त्यांच्या शहरातील रेल्वे स्टेशनची सफाई केली आहे. सकाळी केलेल्या या स्वच्छता माेहिमेत रेल्वे स्टाफही सहभागी झाले हाेते. आयटीआय मुरबाड येथे साफसफाई करून विद्याथ्यार्ंनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. घोडबंदर फोर्ट येथेही विद्याथ्यार्ंनी सफाई केली आहे. आय टी आय कल्याण येथील ३८ प्रशिक्षणार्थी व अधिकारी, कर्मचारींनी, आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी चक्की नाका ते तीसगाव नाका परिसरात एक तास स्वच्छता माेहीम हाती घेतली.
यावेळी तिसाई देवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. या माेहिमेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या जाणे येण्याची व रिफ्रेशमेंट ची सोय करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. वरिष्ठ कार्यालयाचे नितीन निकम यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधीक्षक महेश जाधव यांनी लाेकमतला सांगितले.