शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

उल्हासनगरातील स्वच्छता अभियानाची खा. शिंदे यांच्याकडून पाहणी, महापालिका रुग्णालयाला भेट

By सदानंद नाईक | Published: January 05, 2024 7:17 PM

कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी महापालिकेने रिजेन्सी येथे रुग्णालय उभारून ११ कोटी पेक्षा जास्त किंमतचे साहित्य खरेदी केले होते.

उल्हासनगर: शहरातील स्वच्छता अभियानाची व महापालिका रिजेन्सी येथील रुग्णालयाची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळी आमदार कुमार आयलानी, बालाजीकिणीकर, महापालिका आयुक्त अजीज शेख आदीजन उपस्थित होते. उल्हासनगर महापालिका साफसफाई स्वच्छता अभियानाबाबत अग्रेसर असून मुंबईपासून सुरुवात झालेले हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी शहर स्वच्छता अभियान भेटी वेळी दिली. वाढत जाणारे शहरीकरण पाहता आता मनुष्यबळापेक्षा यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याची गरज निर्माण झाल्याचे शिंदे म्हणाले. तसेच आठवड्यातील तीन दिवस महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग निहाय विशेष डीप क्लीन अभियान राबविले तर शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल. अशी भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. 

शहरातील स्वच्छता अभियानाची पाहणी केल्यानंतर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रिजेन्सी येथील महापालिका रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालय कामाची पाहणी केली. कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी महापालिकेने रिजेन्सी येथे रुग्णालय उभारून ११ कोटी पेक्षा जास्त किंमतचे साहित्य खरेदी केले होते. रुग्णालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत असतांना अचानक रुग्णालयाचे खाजगीकरण झाल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खासदार शिंदे यांच्या पाहणी दौऱ्या वेळी आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार कुमार आयलानी, महापालिका आयुक्त अजीझ शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह स्थानिक पक्ष पदाधिकारी आदीजन उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर