शशी करपे, वसईटेहळणीसाठी उभारलेल्या महत्वाच्या अर्नाळा किल्ल्यातील हनुमंत बुरुजाची पडझड सुरु असून त्याचे जतन व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून किल्ले वसई मोहिमेचे शिलेदार नियमितपणे त्याची सफाई करीत असतात. यंदाच्या मोहिमेत मी जागृत बंदरपाडेकर परिवारही सहभागी होता. पोर्तुगिजांनी समुद्रात बांधलेल्या अर्नाळा किल्ल्यात मराठ्यांनी टेहळणीसाठी भक्कम असा हनुमंत बुरुज बांधला होता. सध्या दुर्लक्ष झाल्याने या बुुरुजासह किल्ल्यातील अनेक भागात पडझड सुरु झाली आहे. पुरातत्व विभागामार्फत गेली चार वर्षे किल्ल्याच्या जतनीकरणाचे काम सुरु आहे. पण, मुख्य किल्ल्यापासून काही अंतरावर असलेल्या हनुमंत बुरुजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. हनुमंत बुरुजाची पडझड थांबून त्याचे जतन व्हावे यासाठी किल्ले वसई मोहिमेचे शिलेदार गेल्या सहा वर्षे बुरुजाच्या अंतर्गत भागाची स्वच्छता करीत आहे. मुख्य बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या नसल्याने वडाच्या पारंब्याचा आधार घेत बुरुजावर चढावे लागते. वड पिंपळाच्या प्रचंड विस्ताराने बुरुजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बुरुजाच्या कठड्यावर उगवलेली दाट झाडी व वड पिंपळाचा विस्तार करण्याचे काम शिलेदार करीत असतात. इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्यासह अर्नाळा गावातील मी जागृत बंदरपाडेकर परिवाराचे निनाद पाटील, आशिष पाटील रविवारी आपल्या सहकार्यांसह बुरुजाची सफाई करण्यासाठी गेले होते. पाच तास अथक मेहनत करून बुरुजाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
अर्नाळ्यातील हनुमंत बुरुजाची सफाई
By admin | Published: March 15, 2017 1:54 AM