शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आॅनलाइन फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद

By admin | Published: May 29, 2017 6:03 AM

आॅनलाईन फार्मसीविरोधात औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळणार आहेत. त्या दिवशी रुग्णालयाशेजारची

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण: आॅनलाईन फार्मसीविरोधात औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळणार आहेत. त्या दिवशी रुग्णालयाशेजारची औषधाची दुकाने सुरु राहणार आहेत. राज्यातील ५५ हजार, ठाणे जिल्ह्यातील पाच हजार आणि कल्याण-डोंबिवलीतील ७०० औषध विक्रेत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती केमिस्ट असोशिएशन आॅफ ठाणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी असोशिएशनचे चिटणीस विजय सुराणा, कल्याणचे अध्यक्ष विनय खटाव उपस्थित होेते. आॅनलाईन व ई फार्मसीमुळे झोपेच्या गोळ््या, ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधे सहज विकत घेतली जाऊ शकतात. त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे आॅनलाईन व ई फार्मसी औषध विक्रीला विक्रेत्यांचा विरोध आहे. आॅनलाईन विक्रीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकत घेतली जाऊ शकतात. त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ई फार्मसीमध्ये बनावट औषधे विकली जाण्याचा धोका जास्त आहे. आॅनलाईन व ई फार्मसीत डॉक्टरांची चिठ्ठी योग्य आहे की नाही, याची तपासणी करणारी यंत्रणा सरकारकडे नाही. आॅनलाईन व ई फार्मसीला विरोध करण्यासाठी विविध औषध विक्रेत्यांनी विरोध दर्शविणारी ५० ते ६० पत्रे सरकारला लिहिली आहेत. औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व आमदार जगन्नाथ शिंदे यांनी हा प्रश्न संसदेपर्यत नेला. खासदार राजन विचारे व श्रीकांत शिंदे यांनी या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले, असे सांगण्यात आले.मुंबईच आझाद मैदानात मूक धरणे धरले जाईल. सरकारने त्याची दखल घेतली नाही, तर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.आॅनलाईन व ई फार्मसीत भरली जाणारी माहिती कितपत सुरक्षित राहिल या विषयी साशंकता आहे. या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. आॅनलाईन व ई फार्मसी औषध विक्री ही शहरात केली गेली तरी ग्रामीण भागाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. तेथे इंटरनेट आॅफलाईन असते. तसेच विजेची समस्या आहे. ग्रामीण भागाला त्याचा काही उपयोग होणार नाही. ई फार्मसीसाठी औषध विक्रेत्याला सरकारदरबारी नोंदणी करावी लागणार आहे. विकलेल्या औषधांच्या किंमतीच्या एक टक्के रक्कम ही सरकारला जाणार आहे. आॅनलाईन व ई फार्मसी औषध विक्रीमुळे देशातील आठ लाख औषध विक्रेत्यांच्या पोटावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. हे धोके लक्षात घेऊनच सरकारने आॅनलाईन व ई फार्मसी औषध विक्रीचा निर्णय मागे घ्यावा.सरकार परकी चलनाच्या गुंतवणूकीसाठी आॅनलाईन व ई फार्मसीचा निर्णय लागू करणार आहे. स्पर्धात्मक व्यावसायिकेपोटी व परकीय चलनासाठी औषद विक्रेत्यांचा बळी सरकारने देऊ नये. विकसनशील देशात आॅनलाईन व ई पोर्टलला विरोध होत आहे. भारतातूनही त्याला विरोध होत असल्याने ई पोर्टल व आॅनलाईनचा निर्णय सरकारने रद्द केला तरच तो सगळ्यांचा हिताचा आहे.