- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील जीवन प्राधिकरणाचे बंद पडलेल्या निवासस्थानाचा ताबा गर्दुल्ले, नशेखोर, भुरटे चोरांनी घेतला असून रात्रीचा खेळ चालेची जोरदार चर्चा आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाहीतर मोठी घटना होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्राधिकरणाने सदर जागा जागा महापालिकेकडे हस्तांतर करा. अशी मागणी कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी केली.
उल्हासनगरातील पूर्वी पाणी पुरवठ्याचे नियोजन जीवन प्राधिकरण विभाग करीत होती. चे कार्यालय व निवासस्थान बंद पडले असून प्राधिकरणाच्या काही खुल्या जागा महापालिकेकडे हस्तांतर झाल्या. याशिवाय नेताजी गार्डन, कुर्ला कॅम्प रोड, भाटिया चौक, कॅम्प नं-३ येथील आनंदनगर, साईबाबा मंदिर आदी ठिकाणी जीवन प्राधिकरण विभागाचे बंद पडलेले निवासस्थाने व खुल्या जागा आहेत. त्यांची दुरुस्ती अथवा नुतनीकरण न झाल्याने, बंद पडलेल्या निवासस्थानांचा ताबा गर्दुल्ले, नशेखोर, भुरटे चोरांनी घेतला आहे.
पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाहीतर, मोठी घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जीवन प्राधिकरणाच्या सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेकडे प्राधिकरणाच्या जागा हस्तांतर झाल्यास, प्रभाग समिती कार्यालय यांच्यासह अन्य विभागाचे कार्यालय उभारत येणार असल्याचे मत काँग्रेसचे रोहित साळवे यांनी व्यक्त केले.
शहरातील प्रेमनगर टेकडी, आनंदनगर येथील खुली जागा यांच्यासह इतर जागा महापालिकेकडे यापूर्वीच हस्तांतरीत झाल्या आहेत. मात्र इतर प्राधिकरणाच्या बंद पडलेल्या निवासस्थानात नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर यांचा रात्रीचा खेळ चालल्याची चर्चा जोरदार चर्चा असून पोलीस कारवाईची मागणी सर्वस्तरातून होत आहे.