पंकज राऊत / बोईसरमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण नियंत्रण नियमांची पायमल्ली करणारे तारापूर एमआयडीसीमधील १७ उद्योग बंद केले आहेत. डिसेंबरमधे ३२ उद्योग बंद केल्या नंतर आता नव्याने १७ उद्योगांवर बंदची करवाई करण्यांत आली आहे तर प्रथम बंद केलेल्या ३२ उद्योगा पैकी ५ उद्योग काही अटींवर सुरु करण्यांत आले आहेत.तारापूर एमआयडीसीतील उद्योगां मधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते सरळ नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येत असल्याने त्याचे गंभीर परिणाम किनारपट्टीलगतच्या पर्यावरणावर होऊ लागल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादा कडे याचिका दाखल केल्या नंतर लवादा ने गंभीर दखल घेतली होतीत्या नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळा ने विशेष मोहिमेद्वारे उद्योगांचे सर्वेक्षण करु न सांडपाण्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोग शाळेत तपासणी करु न दोषी आढळलेल्या कारखान्यांवर कारवाई केली होती. तर मागील महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये गणेश बेन्झोप्लास्ट, मेलोडी हेल्थ केयर प्रा. लि., पुलक्रा केमीकल्स प्रा. लि., आरती इंडस्ट्रीज, झेडस इंटरनॅशनल, शुभश्री केमीकल्स, बोस्टन फार्मा, डूफोन लॅब, मनन केम प्लास्ट, श्री सार्इं इंडस्ट्रीज , झोरबा डाय केम, प्रभात इंजीनियरिंग, वेट फार्मा, स्पेक्ट्रोकेम प्रा. लि., शगुन क्लोदींग, आर्विअम डाय केम , उषा फॅशन हे उद्योग दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. अशा उद्योगांचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करून ते बंद केले जात असतात. ही कारवाई आता किती तत्परतेने होते याकडे उद्योग जगताचे लक्ष लागून राहिले आहे.तारापूरचे १७ उद्योग बंद
तारापूरमधील 17 उद्योग बंद
By admin | Published: February 18, 2017 6:24 AM