ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकात सरकत्या जिन्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये सुरुवातीला चढण्यासाठी, तर आता उतरण्यासाठी ते सुरू झाले आहेत. मात्र, काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळेस ते अचानक बंद पडण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना नाहक त्याचा त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. हे जिने कोणीतरी खोडकरपणे मुद्दामच बंद करत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच बंद पडणारे जिने सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीने २४ तासांसाठी कर्मचारी तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मध्य रेल्वेवरील मुंबई क्षेत्रातील चढण्यासाठी पहिला सरकता जिना ठाणे स्थानकात उभारला. त्याचप्रमाणे उतरण्यासाठी पहिला सरकता जिनाही ठाण्यात सुरू झाला आहे. अशा प्रकारे, ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक-१ आणि १०, ३-४ तसेच ५-६ या ठिकाणी जिने आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बहुतेक वेळा दिवसातील पाच ते सहा वेळा एक ना एक जिना बंदच अवस्थेत असतो. हीच बाब ठाण्यातच नाही तर, मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांतील जिन्यांची आहे. कोणीतरी बटण दाबून ते खोडसाळपणे बंद करते किंवा त्या जिन्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या पायरीवर सेन्सर असल्याने कोणी जोरात धावत गेल्यावरही जिना बंद पडतो. बंद पडलेला जिना चावीशिवाय पुन्हा सुरू होत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मध्यंतरी एका प्रवासी व्यक्तीने जिना बंद पडतो का, हे पाहण्यासाठी जिना बंद करणारे बटण दाबले होते.>चावीच्या जागी चुनाउल्हासनगर येथे जिना चालू करण्यासाठी ज्या ठिकाणी चावी लावावी लागते, त्या ठिकाणी कोणीतरी चुना टाकण्याचे काम के ले होते, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.‘‘जिने बंद पडण्याचे प्रकार ठाण्यातच नाहीतर सर्वत्र आहे. पण, ठाण्यात जिने बंद पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. प्रामुख्याने ते कोणीतरी खोडकरपणे बंद पाडतात.’’- सुरेश व्ही. नायर, डायरेक्टर, ठाणे रेल्वेस्थानक
बंद सरकत्या जिन्यांमुळे प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 2:48 AM