कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभशकुन मानायला हरकत नाही, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी काढले.
कोरोना काळात टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल दीड वर्षे सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, अधिकारी यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते टाटा आमंत्रा येथे करण्यात आला. आयुक्तांच्या हस्ते कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, प्रमोद मोरे, डॉ. दीपाली मोरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त रामदास कोकरे, उपायुक्त सुधाकर जगताप, शहर अभियंत्या सपना कोळी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पानपाटील, डॉ. सरवणकर, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त पवार यांनी आयुक्त हे मित्र आणि फिलॉसॉफर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे काम करणे शक्य झाले. शहर अभियंत्या कोळी यांनी टाटा आमंत्रा हे चांगल्या आरोग्य सेवेमुळे महाराष्ट्रात वाखाणले गेले. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता इतरांना धीर देत रुग्णांचे मनोबल वाढवले. टाटा आमंत्रामध्ये दीड वर्षात ४० हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.
...........
फोटो-कल्याण-केडीएमसी सत्कार
फोटो ओळ- आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांचा सत्कार करताना.
-------------------------
वाचली.