शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

क्लस्टरसाठी ८५ वर्षांच्या वृद्धेचे सामान रस्त्यावर टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 2:47 AM

तब्बल ४० वर्षे पागडीवर घेतलेल्या किराणा मालाच्या दुकानाचे टाळे तोडून एका ८५ वर्षीय वृद्धेचे सामान रस्त्यावर टाकून

ठाणे : तब्बल ४० वर्षे पागडीवर घेतलेल्या किराणा मालाच्या दुकानाचे टाळे तोडून एका ८५ वर्षीय वृद्धेचे सामान रस्त्यावर टाकून दुकानावर कब्जा केल्याचा प्रकार हाजुरी गावात २२ मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी थेट अपर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर संबंंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वत्सला वामन पडवळ (८५), रा. नारायण डायरे चाळ, हाजुरी गाव, ठाणे येथे ५ मार्च १९७९ रोजी ५०० रुपये अनामत रक्कम आणि महिना ६० रुपये भाडेतत्त्वावर पागडीवर १० बाय १० चौरस फुटांचा गाळा पडवळ दाम्पत्याने डायरे यांच्याकडून घेतला. त्याठिकाणी त्यांनी किराणा दुकान सुरू केले. दरम्यान, १८ वर्षांपूर्वी वामन पडवळ यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर वत्सला यांनी दुकान चालू ठेवले. ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी हे दुकान चालवले.ठाण्यात क्लस्टर योजना लागू झाल्याने मूळ मालक नारायण डायरे यांची मुले सुरेश आणि गुलाब डायरे यांनी २२ मार्च २०१८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान वत्सला यांच्या दुकानाचे टाळे तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामान रस्त्यावर टाकले. दुकानातील रोकड घेऊन दस्तऐवजही चोरले. दुकानावर कब्जा करून डायरे बंधूने दुकानाला टाळे लावले.वत्सला पडवळ यांच्या दुकानाचा १९७९ चा गुमास्ता परवाना तसेच १९८२ या वर्षाची भाडेपावती यात गायब करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून न घेतल्याने वत्सला यांनी ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन ही कैफियत मांडली.