शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

क्लस्टरला मंजुरी नाहीच; पालकमंत्र्यांकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:23 AM

आचारसंहितेच्या आधी एका तरी क्लस्टरचा नारळ फुटावा, असा आग्रह धरणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांची दिशाभूल केल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानने केला आहे.

ठाणे : आचारसंहितेच्या आधी एका तरी क्लस्टरचा नारळ फुटावा, असा आग्रह धरणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांची दिशाभूल केल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानने केला आहे. शासनाने १७ सप्टेंबर रोजी क्लस्टरसंदर्भात सूचना व हरकती मागविल्या असून कोणत्याही प्रकारची तत्त्वत: मान्यता दिलेली नाही. हे सत्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभियान जनजागृती करणार आहे.क्लस्टरसंदर्भात नागरिकांनी सूचना, हरकती या एकगठ्ठा न देता वैयक्तिक स्वरूपात कोकण भवनला सादर कराव्यात, असे आवाहनदेखील अभियानने केले. क्लस्टर योजनेतील किसननगर यूआरपीच्या किसननगर आणि जयभवानीनगर या दोन सबक्लस्टरचे प्लॅन आणि नकाशे यांना तत्त्वत: मान्यता दिली असल्याची घोषणा शिंदे यांनी १८ सप्टेंबरला केली होती. यामध्ये ठाणेकरांना मालकी हक्काचे घर मिळणार, असेही सांगितले होते. किसननगर हे सर्वात मोठे क्लस्टर असून अस्तित्वात असलेली जागा आणि प्रस्तावित विकास यांचा अभ्यास करून सर्व योजना तयार केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. यामुळे डीपी रोडचादेखील विकास होणार असून रस्त्यांचे नेटवर्क मजबूत होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, क्लस्टरला कोणत्याही प्रकारची तत्त्वत: मान्यता नसून केवळ सूचना आधी हरकतींसाठी १७ सप्टेंबर रोजी ही अधिसूचना काढली आहे, अशी माहिती संजीव साने यांनी दिली. मात्र, तिचा आधार घेऊन पालकमंत्र्यांनी मतांसाठी ठाणेकरांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला.>मालकीचे घर मिळणार नाहीचनगरविकास खात्याचे कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या सहीने १७ सप्टेंबर रोजी राजपत्रात नागरिकांसाठी एक सूचना प्रकाशित केली आहे. त्यावर एक महिन्याच्या आत म्हणजे १६ आॅक्टोबरपर्यंत नागरिकांनी हरकती व सूचना सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांच्याकडे देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्या हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यात मूळ नोटिफिकेशन जे ५ जुलै २०१७ रोजी जाहीर झाले आहे, त्यात अनेक बदल करण्याची विनंती पालिकेने केली होती. त्यातील काही योग्य सूचना होत्या, पण महत्त्वाची सूचना म्हणजे ‘मालकीचे घर मिळावे’ ही सूचना शासनाने फेटाळली आहे, (लीजची मूळ तरतूद कायम आहे) हरकत घेण्यासाठी सूचना १७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यात या मालकीच्या घराबाबत उल्लेखही नाही. परंतु, पालकमंत्री व आयुक्त ३०० चौरस फुटांचे घर मालकी हक्काने मिळेल. जमीन लीजची असेल, अशी घोषणा कशी करू शकतात? ही जनतेची दिशाभूल असल्याचेही त्यांनी सांगितले.घरांचे क्षेत्र नक्की किती? : मूळ योजनेत ३२३ चौ. फुटांचे घर होते, ते ३०० चौ. फुटांचे कसे झाले? यातही बिल्टअप की कार्पेट, याचा खुलासा झालेला नाही. तोही महापालिकेने करावा, अशी मागणी केली. पुनर्विकास करताना, त्रिपक्षीय करार करताना महापालिकेनेदेखील सहभागी व्हावे, अशी मागणी केली असून यावर जनजागृती करणार असल्याचे अभियानाचे पदाधिकारी संजीव साने, डॉ. चेतना दीक्षित, उन्मेष बागवे आणि अनिल शाळीग्राम यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे