लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बाळासाहेबांची भुमिका, त्यांचे विचार कोणी खंडीत केले, त्यांच्या विचारांबरोबर प्रतारणा कोणी केली, सत्तेसाठी तडजोड कोणी केली हे मला सांगण्याची आवश्यकता आहे का?, बाळासाहेबांच्या विचाराची भुमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत, आणि म्हणूनच राज्यातील प्रत्येक घटक हा आमच्या भुमिकेला समर्थन देत असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मात्र योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील त्यांनी उध्दव ठाकरे यांना दिला.
ठाण्यात गुरुवारी उध्दव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने टेंभी नाका देवीची महाआरती करुन एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले असतांनाच शुक्रवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह देवीची विधिवत पुजा केली. तसेच महाआरती देखील केली. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेवे त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. ठाण्यात गुरुवारी उध्दव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने टेंभी नाका देवीची महाआरती करुन एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले असतांनाच शुक्रवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह देवीची विधिवत पुजा केली. तसेच महाआरती देखील केली. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेवे त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा नवरात्रोत्सव आहे. या उत्सवाला वेगळी ओळख आहे, यथोचित पुजन व आरती दरवर्षी करीत असतो, यात सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते नागरीकांसोबत आरती केली असल्याचे त्यांनी सांगितले. देवीची सेवा करीत करीत मी य पदार्पयत पोहचलो आहे. देवीचा आर्शिवाद सर्वावर आहे, तो राज्यातील जनतेवरही राहावा. राज्यातील संकट, अरीष्ट, रोगराई, दुख सर्व दुर व्हावे, लोकांचे जीवन बदलू दे, त्यांच्या जीवनात अमुर्लाग बदल होऊ दे, त्यांच्या जीवनात सुख, समृध्दी, समाधान आरोग्य चांगले लाभू दे आणि या राज्याला सुजलाम सुफलाम होऊ दे अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना केली असल्याचेही त्यांनी सांगितले. रश्मी ठाकरे यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावर त्यांना विचारले असता, ही शक्तीप्रदर्शनाची जागा नाही, ही मनोभावे पुजा करण्याची जागा असल्याचे त्यांनी सांगितले. टेंभीनाक्याचा हा उत्सव आहे, तो अखंडीतपणो पुढे नेण्याचे काम मी शिवसैनिक म्हणून करीत आहे. संजय राठोड यांच्या बाबत प्रश्न विचारला असता ११ महंत त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्या समवेत वडील संभाजी, पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातू आदींसह कुटुंबातील इतर सदस्य या पुजेत सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास ही पुजा सुरु झाली. तर साडेतीन वाजता महाआरती घेण्यात आली. यावेळी शिंदे गटातील महत्वाचे पदाधिकारी व इतर कार्यकत्र्यानी टेंभीनाक्यावर गर्दी केली होती.