शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवतील; गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला विश्वास

By अजित मांडके | Published: October 13, 2022 10:02 PM

सदावर्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ११८ क्रांतिवीर कष्टकरी कामगारांना रुजू करण्यात आले आहे.

ठाणे : महाराष्ट्र हे श्रमिकांच्या चळवळीसाठी अग्रेसर राहिलेले केंद्र आहे. परिणामी ठाण्याचे असलेले लोकाभिमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिकधिक पणे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि प्रवाश्यांच्या सोयीवर निधी  देतील, असा विश्वास ऍड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला. 

ठाण्यातील खोपट येथील राज्य  परिवहन मंडळाच्या डेपोत एसटी कष्टकरी जनसंघा या संघटनेच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी ते गुरुवारी आले होते. नवीन बससाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या पत्नी ऍड   जयश्री पाटील आणि त्यांची मुलगी झेन याही उपस्थित होत्या.  यावेळी कष्टकरी जनसंघाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. ढोल ताशे आणि फटाके वाजवून सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले.

सदावर्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ११८ क्रांतिवीर कष्टकरी कामगारांना रुजू करण्यात आले आहे. तसेच कष्टकरी एसटी कामगारांचे पगार  देखील तातडीने करण्यात आलेले आहेत. त्याच प्रमाणे आता दिवाळीच्या बोनस बाबत आम्ही आग्रह लावून ठेवलेला आहे. विलगीकरणाचा लढा आम्ही वेळोवेळी लावून धरणारचं  आहोत. तसेच २०१९ मध्ये पास झालेल्या विध्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून त्या बेरोजगार कष्टकऱ्यांना नोकरी देण्यात यावी हि आग्रहाची मागणी आम्ही  राज्यसरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्ण प्रकाशमान करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेST Strikeएसटी संपGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते