शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

९० टक्के कंपन्या बॉयलरसाठी वापरतात कोळसा

By admin | Published: January 04, 2016 1:54 AM

उद्योगांना परवानगी देताना प्रदूषण टाळण्याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बायोमास ब्रिकेट इंधनाचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली असतानाही

मुरलीधर भवार,  कल्याणउद्योगांना परवानगी देताना प्रदूषण टाळण्याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बायोमास ब्रिकेट इंधनाचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली असतानाही ९० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या ही सक्ती धाब्यावर बसवून दगडी कोळशाचा वापर करीत आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी त्यात भर पडत आहे. कंपन्या स्वस्त इंधन खरेदीच्या सोसापायी माणसाच्या जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या विषयाचा अभ्यास असलेले डोंबिवलीतील अभ्यासक चंद्रहास पाटील यांनी सांगितले की, हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच बड्या कंपन्या बायोमास ब्रिकेटचा वापर इंधनासाठी करीत आहेत. जवळपास ९० टक्के कंपन्यांच्या बॉयलरकरिता दगडी कोळसा, फर्नेस आॅइल, डिझेल यांचा वापर केला जातो. त्यातून कार्बन मोनॉक्साइड व सल्फरडाय आॅक्साइड वातावरणात मोठ्या प्रमाणात सोडले जाते. कोळसा जाळल्याने ग्रीन हाऊस इफेक्ट वाढीस लागला आहे. त्यामुळे पर्यावरणाला जास्त धोका निर्माण झाला आहे. केमिकल्स व औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांत पाण्याची वाफ करण्यासाठी बॉयलरची आवश्यकता असते. ९० टक्के कंपन्यांत बॉयरल असतोच. त्याचा रासायनिक प्रक्रियेसाठी उपयोग केला जातो. स्वस्त इंधन वापरून पैसे वाचवायचे आणि उत्पादनातून बक्कळ पैसा कमवायचा, या नफेखोरी प्रवृत्तीमुळे बॉयलरसाठी सगळ्यात जास्त प्राधान्य दगडी कोळशाला दिले जाते. त्यानंतर, फर्नेस आॅइल आणि डिझेलला ते दिले जाते. डोंबिवलीतील कारखान्यांतून कोळशाचा वापर होत असल्याने औद्योगिक निवासी परिसरातील घरांचे छत काळे होणे, गच्चीवर काजळी व राखेचा थर दिसून येणे, हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. नागरिकांनी याविषयी वारंवार तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. दगडी कोळशात भारतीय दगडी कोळसा, इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलियन कोळसा असे तीन प्रकार आहेत. या कोळशाची किंमत एक किलोला साडेचार रुपये इतकी आहे. कंपन्यांना टनाच्या प्रमाणात कोळसा लागतो. तो स्वस्त मिळत असल्याने त्याचा वापर जास्त केला जातो. फर्नेस आॅइल बाजारात ४५ रुपये दराने मिळत होते. आता त्याची किमत घसरली आहे. २५ रुपये झाली आहे. त्यामुळे फर्नेस आॅइलचा वापरही कोळशानंतरचा दुसरा पर्याय आहे. आता चंद्रपूरच्या खाणीतला कोळसा संपुष्टात येत आहे. सध्या बिहार आणि आसाममधून कोळसा येत आहे. हे दीर्घकाळ पुरणारे इंधन नाही. त्याला पर्यायी इंधन अ‍ॅग्रो वेस्टपासून तयार झालेले बायोमास ब्रिकेट आहे. बायोमास ब्रिकेटची बाजारात किलोला साडेपाच रुपये किंमत आहे. त्याच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइड व सल्फरडाय आॅक्साइड शून्य प्रमाणात निर्माण होतो. पर्यावरणासाठी बायोमास ब्रिकेट किती उपयुक्त आणि फायदेशीर आहे, हे महत्त्वाचे आहे. बायोमास ब्रिकेट तयार करून पुरवठा करणाऱ्या कंपन्या अथवा ते उत्पादन करणारे तरुण जवळपास १०० च्या संख्येत आहेत. ते दिवसाला १०० ते ३०० टन ब्रिकेट पुरविण्याची क्षमता ठेवून आहेत. मात्र, त्यांच्याकडे आॅर्डरच नसल्याने त्यांच्या भवितव्यासह पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. कोळशाचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा प्रदूषण नियंत्रण मंडळाने उगारण्याची गरज आहे.