शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

आचारसंहिता संपताच ‘सभां’ चा सपाटा!

By admin | Published: February 15, 2017 4:33 AM

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच कल्याण-डोंबिवली महापालिकेत

कल्याण : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच कल्याण-डोंबिवली महापालिकेत महासभा, परिवहन, स्थायी समिती आणि शिक्षण समिती अशा एकापाठोपाठ सात सभांचे नियोजन आठवडाभरात करण्यात आले आहे. बुधवार, १५ फेब्रुवारीला तर एकाच दिवशी त्यातील पाच सभा होणार आहेत.कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मागील महिन्यात एकही सभा झाली नाही. ६ जानेवारीची परिवहनच्या अंदाजपत्रकाची सभाही आचारसंहितेमुळे घेता आलेली नाही. ती सभा आता बुधवारी सक ाळी १० वाजता होईल. त्यात परिवहनचे अंदाजपत्रक सादर होणार आहे. यानंतर, लगेचच सकाळी ११ वाजता कर दरसादरीकरणाची सभा, तर ११.३० वाजता स्थायी समितीची सभा होईल. याच दिवशी दुपारी २ वाजता परिवहनच्या निवडणुकीनिमित्त बोलवलेली महासभाही होईल. दुपारी ४ वाजता परिवहन समितीची सभा होणार आहे. त्यानंतर, १८ फेब्रुवारीला शनिवारी सकाळी ११.३० वाजता शिक्षण समितीची सभा होईल. तर, २० फेब्रुवारीला सोमवारी सकाळी ११ वाजता महासभा होणार आहे. आज अधिकृत घोषणा परिवहन समितीतील सहा सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार होती. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारीला कोणत्याच पक्षाने अर्ज दाखल न केल्याने ही निवडणूक तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी दुपारी २ वाजता या निवडणुकीसाठी विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, अर्जच न आल्याने निवडणूक होणार नसलीतरी या सभेत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तसेच महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने यांनी या निवडणुकीतील गुप्त मतदान प्रक्रियेला घेतलेली हरकत पाहता पुढील निवडणूक कशाप्रकारे घेतली जाईल, याचीही माहिती या सभेत देण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)