शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

कोनगाव येथे १२० युनिट रक्त संकलित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:23 AM

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे रक्तदान शिबिर

कल्याण : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने कोनगाव येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे राबवलेल्या रक्तदान शिबिरात १२० युनिट रक्त संकलित करण्यात आले.कोनगाव येथील शिबिरासाठी सर जे. जे. महानगर रक्तपेढीची मदत घेण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या डोंबिवली क्षेत्राचे प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते झाले. कोनगाव व परिसरातील नागरिकांनीही या शिबिरात सहभाग घेतला. आमदार नरेंद्र पवार, संयोजक जगन्नाथ म्हात्रे यावेळी उपस्थित होते.पवार म्हणाले की, एखाद्या ठिकाणी आपत्ती आल्यानंतर रक्तदान किंवा आरोग्य शिबिरे भरवली जाताते. परंतु, संत निरंकारी मिशन सातत्याने रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे, असे समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. या मिशनतर्फे दरवर्षी २४ एप्रिलला रक्तदान शिबिरांची मालिका सुरू होते आणि ती पुढे वर्षभर चालू राहते.हसबे म्हणाले, बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी स्वत: रक्तदान करून मिशनच्या रक्तदान अभियानाचा प्रारंभ १९८६ मध्ये केला. त्यावेळी त्यांनी रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नाही, अशी सूचना केली होती. निरंकारी भक्तांनी रक्तदानाला आपल्या भक्तीचे एक अंग मानले असून, त्यात सातत्याने मोठ्या संख्येने भाग घेतले आहेत. आजवर भक्तांनी १० लाखांहून अधिक युनिट रक्तदान केले आहे. मिशनच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून रक्तदानाचे कार्य मिशनद्वारे पुढे नेले जात आहे.दरम्यान, पवई इंग्लिश हायस्कूल, आयआयटी, पवई येथील शिबिरात १५३ युनिट तर, नालासोपरा येथे ३०७ युनिट रक्त संकलित करण्यात आले. कोनगावचे शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी म्हात्रे, सेवादल संचालक प्रकाश कोकतरे, प्रबंधक चंद्रकांत दाभणे आदींनी मेहनत घेतली.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीkalyanकल्याण