शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

नगरपालिका कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा : प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 6:02 AM

जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींमधील अधिकारी आणि कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींमधील अधिकारी आणि कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करून २१ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याने शहरातील कारभार ठप्प पडण्याची शक्यता आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना दिले.राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीमधील कार्यरत सर्व मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संघटनेमार्फत बरीच आंदोलन करण्यात आली आहेत. त्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला आहे. सरकारी स्तरावर प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठकाही घेण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही. विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रत्येक विभागातील प्रांताधिकाºयांना दिले. तर अलिबाग नगरपालिकेतील कर्मचाºयांनी संघटनेचे तालुकाध्यक्ष भालचंद्र महाडिक यांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या जिल्हाधिकारी रायगड यांना निवेदन दिले.राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींमधील कर्मचाºयांना राज्य शासकीय कर्मचाºयांबरोबरच १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा, वसुलीच्या प्रमाणात वेतनासाठी सहायक अनुदान देण्याचा निर्णय रद्द करून नगरपालिका, नगरपंचायतींमधील कर्मचाºयांना १०० टक्के वेतन सरकारमार्फत द्यावे, जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचाºयांनुसार नगरपालिका कर्मचाºयांना सर्व लाभ देण्यात यावेत, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यासाठी सरकारने मोफत जागा उपलब्ध करून द्यावी, नगरपालिका कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके सरकारी कर्मचाºयांनुसार लागू करण्यात यावी, अनुकंपाधारकांची नियुक्तीची प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, नगरपालिकेमधील कंत्राटी पध्दती, ठेका पध्दती बंद करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.९३९ कर्मचारी झाले सहभागी१गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आणि त्याकडे सरकार सातत्याने करीत असलेले दुर्लक्ष याच्या निषेधार्थ आणि आपल्या मागण्या मान्य करण्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याकरिता बुधवारी जिल्ह्यातील अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत, माथेरान, रोहा, महाड, श्रीवर्धन, मुरुड आणि उरण या १० नगरपरिषदा आणि खालापूर, माणगाव, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या पाच नगरपंचायतीमधील कर्मचाºयांनी एकदिवस सामुदायिक रजा आंदोलन केले. या सर्व नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये एकूण ११६९ कर्मचारी असून त्यापैकी ९३९ कर्मचारी या रजा आंदोलनात सहभागी झाले होते, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.२खालापूर, माणगाव, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या जिल्ह्यातील पाच नव्या नगरपंचायतींच्या समस्या नगरपालिकांपेक्षाही गंभीर आहेत. अनेक नगरपंचायतींना कार्यालयास पुरेशी व सुयोग्य जागा नाही तर अपेक्षित अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी नव्या नगरपंचायती अद्याप प्रभावीपणे काम करु शकत नसल्याने अनेक समस्यांना नगरपंचायतींना सामोर जावे लागत आहे, तर त्याचा विपरीत परिणाम शहर व्यवस्थापनावर होत असल्याने याबाबतही शासनाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे नगरपंचायत कर्मचाºयांनी सांगितले. विविध प्रलंबित असणाºया मागण्यांची दखल शासनाने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त के ली.माथेरान नगरपालिका कर्मचाºयांचे काम बंद माथेरान : माथेरानमधील नगरपालिकेच्या सर्वच कामगारांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी ९ आॅगस्ट या क्र ांतिदिनी एक दिवसीय काम बंद आंदोलन नगरपालिकेच्या कार्यालयासमोरच करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी नगरपालिकेतील प्रमुख अधिकारी मंडळी तसेच वरिष्ठ लिपिक नरेंद्र धनावडे ,प्रभारी आरोग्य निरीक्षक राजेश रांजाणे, लिपिक रीषीता शिंदे, मुकादम शेट्ये, अभियंता पाटील, नगरपालिकेच्या दवाखान्यातील कर्मचारी त्याचप्रमाणे सफाई कामगार सुद्धा यामध्ये सहभागी झाले.हे काम बंद आंदोलन कामगार संघटना, संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आले. १० ते १४ आॅगस्टपर्यंत सर्वच कामगार काळ्या फिती लावून शासनाच्या निषेधार्थ काम करणार आहेत. १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री, खासदार, आमदार यांना आंदोलनाच्या निवेदनाच्या प्रती देण्यात येणार असून सर्वच कामगारांनी आंदोलनाची दिशा ठरवून सक्रि यपणे आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. जर शासनाने सदरची बाब गांभीर्याने घेतली नाही तर २१ आॅगस्टपासूनच बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या सर्वच कामगार वर्गाकडून सांगण्यात आले आहे.दखल न घेतल्यास काळ्या फिती लावून करणार कामआगरदांडा : मुरुड-जंजिरा नगरपालिका कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बुधवारपासून मुरुड-जंजिरा नगरपालिकेचेसर्व कर्मचारी सामुदायिक रजेवर आहेत. याबाबतची माहिती नगरपालिका कामगार संघटनेचे सचिव प्रकाश आरेकर यांनी दिली. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास १० ते १४ आॅगस्टपर्यंत काळ्या फिती लावून काम करू, १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर खासदार, आमदारांना आंदोलनाचे निवेदन देण्यात येतील. त्यावर कोणताही निर्णय न झाल्यास २९ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यामधील विविध मागण्यांबाबत प्रतिसाद न मिळाल्यास येत्या २९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात सर्व कर्मचाºयांना मुरु डच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी भेट घेऊन तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी शर्तीने प्रयत्न करू तसेच नगरपालिके चे सर्व नगरसेवकांच्या साह्याने आम्ही निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक पांडुरंग आरेकर, नरेंद्र नांदगावकर , अशोक सबनीस, किशोर माळी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.श्रीवर्धनमध्ये कामकाज ठप्पश्रीवर्धन : नगरपालिका कर्मचाºयांनी आपल्या न्याय हक्क मागणी पूर्ततेसाठी एक दिवसाचे सामुदायिक रजा आंदोलन केले.राज्यातील नगरपालिका कर्मचारी वर्गास १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा, नगरपालिका कर्मचाºयांना १०० टक्के वेतन शासनामार्फत देण्यात यावे, प्रगती योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा, कंत्राटी /हंगामी कर्मचाºयांना समान काम समान वेतन देण्यात यावे, नगरपरिषद संचालनलयात नगर परिषद कर्मचारी असावेत, मुख्याधिकारी पदाचा दर्जा गट अ करण्यात यावा या प्रमुख मागण्या व इतर प्रलंबित मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. ९ आॅगस्टच्या रजा आंदोलनानंतर शासनाने मागण्या मान्य न केल्यास २१ आॅगस्टला नगरपालिका कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कर्मचाºयांनी निवेदनात नमूद केला. कर्मचाºयांच्या आंदोलनातील सर्व मागण्या राज्य सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरवठा करू, असे आश्वासन नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने यांनी दिले.राज्य सरकारने कर्मचारी वर्गाच्या मागण्या मान्य कराव्यात, सर्व मागण्यां ची पूर्तता होई अशी मी आशा बाळगते. जनतेस आंदोलनाची झळ बसणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे.- अर्चना दिवे, मुख्याधिकारी, नगरपालिका, श्रीवर्धन