ठाणे : नवीन लेखकांना आपणच ग्रेट लिहितो असं वाटत असतं तर त्यांनी जरा थांबून विचार करण्याची आवश्यकता आहे, आपल्या लेखनाकडे गंभीरपणे पाहणं आवश्यक आहे. संशोधन करण्यासाठी जी चिकाटी , जिद्द लागते पूर्वीच्या अभ्यासकांपेक्षा आजच्या काळातील अभ्यासकांकडे कमी पडतेय असे मत जेष्ठ साहित्यिक सुनील कर्णीक यांनी व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषद,ठाणे शहर शाखा व जवाहर वाचनालय कळवा याच्या संयुक्त विद्यमाने ५ वा वाचकमंच जवाहर वाचनालय कळवा कै शिवराम पाटील सभागृहात संपन्न झाला. सुनील कर्णिक यांनी आपल्या मुलाखतीत मौज, मॅजेस्टिक मधील आठवणी कथन करत, संपादन कौशल्याची विविध तंत्र , व्यवहार स्पष्ट केले. महाराष्टाबाहेरही मराठी साहित्यविषयक घडामोडी चालू असतात, त्यात मराठी मधील किती साहित्य अनुवादित झालंय हे पाहणं फार गरजेचं आहे, तशा प्रकारचं काम मला करायला मिळतंय त्याचा आनंदच आहे.."लेखकांनी कोणत्या काळात काय लिहावे हे आपण ठरवू शकत नाही त्यांना जे आणि जसे व्यक्त व्हायचे तसे ते होतात,मात्र वाचन कला, काव्य , साहित्य यांचा मिलाफ असलेला हा वाचकमंच अभिरुचिसंपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतो असे कर्णिक पुढे म्हणाले. अभिरुचिसंपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा या हेतूने गेले काही महिने वाचकमंच नियमितपणे राबविण्यात येत आहे या उपक्रमात वाचकांचा वाचनविश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वाचकांनी वाचाकमंच वर आपापल्या आवडीच्या पुस्तकांविषयी मते मांडावीत . अनेक वाचकांच्या सहभागाने यशस्वी पार पडलेल्या वाचाकमंच कार्यक्रमातून आजचा वाचक काय वाचतो, कोणत्या प्रकारचे लिखाण आवडते, कोणते लेखक आवडतात यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी .वाचकांनी वाचाकमंचावर एकत्र येऊन आपले विचार मांडले पाहिजेत" असे प्रास्ताविकात कोमसापच्या अध्यक्ष मेघना साने म्हणाल्या. यावेळी १० वाचकांनी मला भावलेली कादंबरी या विषयी रसग्रहणात्मक भाष्य केले. यामिनी पानगावकर यांनी 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या अशोक समेळांच्या कादंबरीतील गूढाचा वेध आणि भेद किती परिणामकारकपणे करतेय, हे कुतूहल रसिकांच्या मनात उत्पन्न केले काही प्रसंग सांगून कादंबरीचा आशय व्यक्त केला. मीना बर्दापूरकर यांनी गिरीश कुबेर यांच्या' एका तेलियाने'कथेची दमदार सुरुवात केली. या पुस्तकाचे रसग्रहण केले. पुस्तकातून व्यक्त होत असलेली मीमांसा अत्यंत डोळसपणे टिपत त्याने ती श्रोत्यांसमोर मांडली. ही कथा..डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी..या कादंबरीतील तेलाचे राजकारण व अर्थकारण असे मोठे विषय कादंबरीत येतात असे सांगितले. आरती कुलकर्णी यांना 'मन पाखरू' या भारती मेहता लिखितअत्यंत मनस्वी विश्लेषण केले कादंबरीतील संस्कारक्षम जग भावले .मयुरी कदम यांनी सुभाष भेंडे लिखित अंधारवाटा कादंबरीतील कथेत पात्रांच्या जीवनात होणारी मुल्यांची घसरण व त्यामुळे पुढे येणारा अंधार याचे चित्र रंगविले. सुनील शिरसाट, चित्रे, ठाकूर ,प्रतिभा चांदुरकर ,संगीता कुलकर्णी आदी सहभागी झाले होते. वैशाली राजे या शिक्षीकेने सुमती क्षेत्रमाडे लिखित 'महाश्वेता 'या कादंबरीचे महत्व सागून कोड असलेल्या व्यक्तींना रोगी न समजण्याचा कादंबरीतील संदेश समजावून सांगितला.
प्रसिद्ध निवेदक प्रा.दीपा ठाणेकर यांनी या वेळेच्या वाचकमंचात जेष्ठ साहित्यिक सुनील कर्णीक यांची मुलाखत घेतली आपल्या खुमासदार प्रश्नांनी प्रा.दीपा ठाणेकर यांनी जेष्ठ साहित्यिक सुनील कर्णीक यांना बोलते केले. वाचनालयाचे अध्यक्ष भिडे व सचिव सुशांत दोडके, सदानंद राणे, बाळा कांदळकर, विनोद पितळे हे ही उपस्थित होते. साधना ठाकूर यांनी सुत्रसंचालन केले तर जवाहर वाचनायलयातर्फे मांगले यांनी आभार मानले.