ठाणे : एक चिमणी आली, दाणा घेऊन गेली... अशा बडबडगीतांपासून चिमणीच्या अस्तित्वाने व्यापलेल्या आपल्या परिसरात शनिवारपासून तीन दिवस चिमण्यांची गणना केली जाणार आहे. चिमण्यांची संख्या मोजतामोजता त्यांच्या प्रजातींच्या अभ्यासासाठीही ही गणना महत्वाची आहे. २० मार्चला जागतिक चिमणी दिवस आहे. त्यानिमित्त ही गणना केली जाणार आहे.चिमण्या वाचवण्यासाठी गेली सात वर्षे सुरू असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात कोणताही पक्षीप्रेमी सहभागी होऊ शकतो.भारतात चिमण्याबद्दल फारशी सांख्यिकी उपलब्ध नाही. वेगवेगळ््या सामाजिक संस्थांनी आजवर ती गोळा केली. ती ताडून पाहण्यासाठी १८ ते २० मार्च या काळात रोज साधारण १५ मिनिटे चिमण्यांचे निरीक्षण करावे लागेल. तेवढ्या काळात त्या परिसरात साधारण किती चिमण्या आल्या, याची नोंद ठेवावी लागेल. त्या आधारे चिमण्यांची संख्या, त्यांचा वावर याचा अभ्यास केला जाईल. या मोहिमेत कोणीही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी त्यांना साईटवर जाऊन नोंद करावी लागेल आणि तीन दिवस १५-१५ मिनिटे निरीक्षण करत चिमण्यांची संख्या मोजावी लागेल. (प्रतिनिधी)अभ्यासासाठी फायदा24 जगभरात चिमण्यांच्या साधारण जाती आहेत. त्यांचा यानिमित्ताने अभ्यास होईल.भारतातील चिमण्यांच्या संख्येबद्दलचा तपशील यानिमित्ताने गोळा होईल. त्याचा पुढील अभ्यासासाठी फायदा होईल.परदेशांत खूप आधीपासून ही मोहीम सुरू असल्याने त्यांच्याकडे पक्षी गणनेतील चिमण्यांचा तपशील उपलब्ध आहे. भारतात तेवढी आकडेवारी उपलब्ध नाही.मोजणीत कसे व्हाल सहभागी?चिमण्याच्या मोजणीत सहभागी होण्यासाठी आधी तुमच्या परिसरासह तुमची नोंदणी करायची.या मोहिमेचा तपशील, ती का आवश्यक आहे, याची माहिती worldsparrowday.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे.आपल्या परिसरात साधारण १५ मिनिटांत किती चिमण्या आल्या ते पाहायचे आणि ती माहिती गोळा करायची. आपली ही निरीक्षणे www.ebird.org/india या साईटवर जाऊन नोंदवायची.
चला, आजपासून चिऊताई मोजू या!
By admin | Published: March 18, 2017 3:53 AM