शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

फाऊंटन टोल नाका येथील रस्त्यांच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:06 PM

अलिकडेच खासदार विचारे हे वर्सोवा पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी फाउंटन हॉटेल येथील अतिक्रमण दूर करून मीरा-भार्इंदर महापालिकेने तयार करुन दिलेल्या सेवा रस्त्याची दूरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या रस्त्याची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून दुरु स्ती तसेच देखभाल व्यवस्थितरित्या होत नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यामुळेच या रस्त्याचे काम आठ ते दहा दिवसांमध्ये मार्गी लावावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.

ठळक मुद्दे रस्त्याच्या कामासाठी खासदार राजन विचारे यांनी केला पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मीरा-भार्इंदर महापालिकेने तयार करुन दिलेल्या सेवा रस्त्याच्या दुरु स्ती आणि देखभालीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तातडीने करावे, अशा सूचना ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी अलिकडेच केलेल्या पाहणी दौऱ्यामध्ये प्रशासनाला केल्या होत्या. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामाला सुरुवात केली. कामाची सुरुवात झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.अलिकडेच खासदार विचारे हे वर्सोवा पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी फाउंटन हॉटेल येथील अतिक्रमण दूर करून मीरा-भार्इंदर महापालिकेने तयार करुन दिलेल्या सेवा रस्त्याची दूरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या रस्त्याची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून दुरु स्ती तसेच देखभाल व्यवस्थितरित्या होत नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यामुळेच या रस्त्याचे काम आठ ते दहा दिवसांमध्ये मार्गी लावावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या. हे काम आता सुरु झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी विचारे यांनी पुन्हा या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, मीरा भार्इंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदी अधिकारीही होते. या कामाला सुरुवात झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या पाहणी दौºयामध्ये टोल नाका ते फाउंटन हॉटेलपर्यंतच्या पाचशे मीटरच्या रस्त्याची तीन अधिक तीन मार्गिका वाढविण्याचे काम तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामालाही सुरुवात केल्याची माहिती अधिकाºयांनी त्यांना दिली. मीरा भार्इंदर महापालिकेने तयार केलेल्या सेवा रस्त्याच्या खाली तीन वाहिन्या असल्यामुळे रस्ता उंच झाला आहे. या रस्त्याची पातळी योग्य तºहेने करुन त्यावर डांबरीकरण तातडीने करण्याच्या सूचनाही अधिकाºयांना विचारे यांनी केल्या. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाºया नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक