शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जीएसटीवर टीका; भाजपा लोकप्रतिनिधी भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:10 AM

जीएसटी कायद्यामध्ये जागतिक विक्रम ठरावा, इतक्या दुरु स्त्या आतापर्यंत झाल्या आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीची घिसाडघाई केल्याने सदोष रचनेमुळे भ्रष्टाचाराला प्रचंड वाव असल्याचे प्रतिपादन

बदलापूर : जीएसटी कायद्यामध्ये जागतिक विक्र म ठरावा, इतक्या दुरु स्त्या आतापर्यंत झाल्या आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीची घिसाडघाई केल्याने सदोष रचनेमुळे भ्रष्टाचाराला प्रचंड वाव असल्याचे प्रतिपादन अर्थविषयक सल्लागार व चार्टर्ड अकाउंटंट अजित जोशी यांनी केले. जोशी यांच्या या वक्तव्याला उपस्थित भाजपा नगरसेवकांनी आक्षेप घेत जीएसटीच्या बाजूने आपले मत मांडण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ कार्यक्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी शिंदे, नगरसेवक संजय भोईर यांनी अजित जोशी यांना काही प्रश्न विचारले. त्याचप्रमाणे अन्य काही उपस्थितांनीही उलटसुलट प्रश्न विचारले. वातावरण अधिक तापू लागले. दत्ता बाळसराफ आणि संभाजी शिंदे यांच्यातील चर्चा अधिक गरम झाली. राजकीय वाद होत असतानाच ज्येष्ठ पत्रकार व कार्यक्र माचे अध्यक्ष सुनील तांबे यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले. परंतु, कार्यक्र म संपल्यावरसुद्धा समर्थक आणि विरोधक यांच्यात वादावादी सुरूच होती.युवाराज प्रतिष्ठान, बदलापूर आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र कोकण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीएसटी- काही अनुत्तरीत प्रश्न’ या विषयावर जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जोशी म्हणाले की, सरकारने जीएसटी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत अनावश्यक घाईने व पुरेशा नियोजनाअभावी केली. योग्य सॉफ्टवेअर तयार करण्यात हे सरकार अपयशी ठरले. त्याचा असंघटित छोट्या उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला. १९ मे ते ५ नोव्हेंबर या कालावधीत कायद्यातील तरतुदी, नियम, दरात बदल अशा असंख्य परिपत्रकांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. खरेतर, हा जागतिक विक्र म झाला आहे, अशी कोपरखळी जोशी यांनी लगावली.जकात रद्द केल्याने ज्याप्रमाणे महापालिका आणि पालिका, नगरपंचायतींना शासनावर अवलंबून राहावे लागले, तीच अवस्था या नव्या करप्रणालीमुळे राज्यांची होणार आहे. अन्य देशांमध्ये एकच सरकार असते. आपल्याकडे राज्य आणि केंद्र सरकार अशी दोन सरकारे असल्याने ही करप्रणाली राबवताना फार नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीच्या परिषदा, चर्चासत्रांचे आयोजन करून ठोस उपाय शासनाला सुचवणे आवश्यक असल्याचे तांबे म्हणाले. या करप्रणालीच्या अंमलबजावणीमधील दोष व त्रुटी देखील त्यांनी समजावून सांगितल्या.

टॅग्स :GSTजीएसटी