शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

आयुक्तांनी साधला व्हिडीओ कान्फरसिंगद्वारे सहा. आयुक्तांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 3:49 PM

ठाणे महापालिकेने आता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी एक टुल विकसित केले आहे. याच्या माध्यमातून आॅनलाईन पध्दतीने नागरीक त्याला कोरोनाची कोणती लक्षणे दिसत आहेत, याची माहिती देऊ शकणार आहे. त्यानुसार पालिका देखील पुढील कार्यवाही करणार आहे .

ठाणे : महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयामधून व्हिडीओ कान्फरिन्संगद्वारे सर्व सहाय्यक आयुक्तांशी संवाद साधून कोरोना बाबत आढावा घेतला. या आढावा बैठकीमध्ये त्यांनी बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अति जोखीम गटातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. याबाबत कुठलीही हयगय चालणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोना व्हायरसची स्व-चाचणी अर्थात लक्षण तपासण्याचे टूल सादर करण्यात आले असून प्राथमिक पातळीवरील कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होत असल्याने नागरिकांनी या टूलचा वापर करून स्व चाचणी करावी असे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.ठाणे शहरामधील ज्या व्यक्ती बाधीत आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या अति जोखीम गटातील व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचना देण्याबरोबरच त्या व्यक्तींना काही लक्षणे आढळून आल्यास त्यांना विलगीकरण कक्षात पाठविणे, त्यांची तपासणी करणे ही कामे अतिप्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत त्यांनी प्रत्येक केसनिहाय आढावा घेवून प्रत्येक व्यक्तीचा कंटेनमेंट प्लॅन तयार करावा, त्या प्लॅनतंर्गत एकूण घरे, एकूण लोकसंख्या निश्चित करून त्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या सर्वेक्षणमध्ये काही लोकांना कसली लक्षणे आहेत का, असतील तर त्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सांगितले.             कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे, कोरोना व्हायरसची स्व-चाचणी अर्थात लक्षण तपासण्याचे टूल सादर करण्यात आले असून प्राथमिक पातळीवरील कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होत असल्याने नागरिकांनी या टूलचा वापर करून स्व चाचणी करावी असे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.सदरचे टूल https://bit.ly/TmcSa  या संकेतस्थळावर उपलब्ध असून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या आॅनलाईन स्व-चाचणी टूलचा वापर करावा असे सांगून महानगरपालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी आतापर्यंत ३० हजार नागरिकांना याचा संदेश पाठविण्यात आले असून त्यातील ३ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी ही माहिती भरून पाठविली आहे. जवळपास २ लाख लोकांना हा संदेश पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.             या टूलमध्ये, परदेशातून आलेल्या नागरिकांची किंवा कोरोना रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची बाबत माहिती भरू शकतात. विशेष बाब म्हणजे, या टूलमुळे महानगरपालिकेला चाचणी केलेल्या नागरिकांचा रिअल टाइम डॅशबोर्डही बघता येतो व या टूलने चाचणी केल्यावर एखाद्या व्यक्तीमध्ये करोनासदृश लक्षणे ही मध्यम किंवा तीव्र रूपाची असल्यास अशा व्यक्तीचे, वैयिक्तक तपशील महानगरपालिकेपर्यंत त्वरीत प्राप्त होऊन ताबडतोब संबंधित नागरिकाच्या घरी पथकाची भेट दिली जाईल व आवश्यक ते कामकाज जलद गतीने होईल. यामुळे महानगरपालिकेला संभाव्य संक्र मणास अधिक प्रभावीपणे शोधण्यास मदत होईल, असेही आयुक्तांनी सांगितले. तर या स्व चाचणी टूलची माहिती आापल्या प्रभागातील नागरीकांना द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्या, गटनेते तसेच इतर नगरसेवकांना केले आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका