डोंबिवली : गेल्या आठवड्यात आयुक्त विजय सूर्यवंशी डोंबिवलीमध्ये मानपाडा रस्त्यावर आले. त्यांनी कायापालट अभियानांतर्गत स्वच्छता केली. त्या वेळी मळकटलेले दुभाजक, पदपथांवर डेब्रिज, ठिकठिकाणी साचलेला कचरा बघून नाराजी व्यक्त केली. त्यानुसार शनिवारीही फडके रस्त्याची स्वच्छता करण्याचे नियोजन महापालिका मुख्यालयातून आले. त्यामुळे धाबे दणाणलेल्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्रभर फडके पथ झाडून स्वच्छ केला; पण शनिवारी आयत्या वेळी आयुक्त आलेच नाहीत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नगसेवकांसमवेत स्वच्छ रस्त्यावरच झाडू मारल्याचे दिसत होते.
नगरसेवक संदीप पुराणिक, नगरसेविका खुशबू चौधरी, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी, अभियंते, प्रभागक्षेत्र अधिकारी, कर्मचारी आदी सगळे फडके पथवर सज्ज झाले होते. जोशी यांच्या सूचनेनुसार स्वच्छता निरीक्षक वसंत देगलुरकर यांनी रातोरात सगळी स्वच्छता केली. बकाली हटवण्याचा प्रयत्न केला. बाजीप्रभू चौकातून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली; पण त्याचे रूपांतर प्रभातफेरीत झाले. महापालिकेच्या हिंदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात कटआउट घेऊन स्वच्छतेची जनजागृती केली. त्यांच्यापाठी सर्व अधिकारी, नगरसेवक गणेशमंदिरापर्यंत गेले. तेथे जनजागृती फेरीचा समारोप करण्यात आला. रात्रभर स्वच्छता विभागाने केलेली स्वच्छता नागरिकांच्या चर्चेत होती, अशीच स्वच्छता कायम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी सोशल मीडियावर फटकेबाजी केली.अधिकाºयांकडे मांडले गाºहाणेसंघ स्वयंसेवकांनी नगरसेविका खुशबू चौधरी, संदीप पुराणिक यांना नेहरू मैदानातील कचरा, अस्वच्छतेसंदर्भात गाºहाणे मांडले, त्याची माहिती घेतली असता, तेथे पडणारा कचरा हा परिसरात असणाºया महापालिकेच्याच सफाई कामगारांच्या वसाहतीतून येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांनी ही बाब उपायुक्त धाट यांच्या कानावर घातली. सफाई कर्मचारीच अशी घाण करत असतील, तर ते योग्य नसल्याचे धाट म्हणाले. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊ न पाहणी करून प्रभाग अधिकाºयांना सूचना दिल्या.