ठाणे : मार्चअखेर अर्थसंकल्प मंजूर व्हावा यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनावर दबाव आणला आहे. मात्र, असे असले तरी आयुक्त आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांत झालेला वाद, त्यानंतर बदल्यांमध्ये झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे तो लांबणीवर गेला असून आयुक्तांनी सुटीचा अर्ज दिल्याने तो कोण सादर करणार याकडे लक्ष लागले आहे.गेली काही वर्षे या ना त्या कारणाने ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. याचा विपरीत परिणाम नागरी सुविधा कामांवर होत असतो. विकासकामे वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांचा रोष लोकप्रतिनीधींवर व्यक्त होतो. त्यामुळे अर्थसंकल्प वेळेत मंजूर व्हावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींतील वादामुळे गेल्या काही वर्षांत अर्थसंकल्प मंजुरीसाठी आॅक्टोबर ते डिसेंबर महिना उलाडत आहे. आतादेखील आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात व्हॉट्सअॅपवरील मेसेजवरून झालेला वाद आणि त्यात लोकप्रतिनिधींनी घेतलेली उडी यामुळे वातावरण तापले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मुंबई, कल्याण, उल्हासनगर महापालिकांचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. मात्र, ठाण्याचा अर्थसंकल्प सादर न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.>आयुक्तांनी केली चर्चादरम्यान आयुक्तांनी मंगळवारी बंगल्यावर अधिकाºयांची बैठक घेतल्याची माहिती पुढे येत आहे. त्यानुसार या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता येत्या काही दिवसांत तो मंजुरीसाठी सादर होऊ शकतो, अशीही शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, तो कोण सादर करणार हा मुख्य प्रश्न आहे.अतिरिक्त आयुक्तांकडे आज पदभार सोपविणारपालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका आयुक्त दिर्घकालीन सुटीवर जाण्यापूर्वी बुधवारी पालिकेत हजेरी लावून अतिरिक्त आयुक्त (१) यांच्याकडे पदभार सोपवून जाणार आहेत. त्यानुसार तेच अर्थसंकल्प सादर करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पालिका अर्थसंकल्पावर आयुक्तांनी घेतली बैठक, ठामपा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 1:04 AM