शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

आयुक्तच होणार तिकीट तपासनीस

By admin | Published: July 11, 2015 3:27 AM

ठाणे परिवहन सेवेतील ३५ टीसींकडून महिन्याला केवळ १२०० रुपये दंडाची वसुली होत असल्याची बाब शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील ३५ टीसींकडून महिन्याला केवळ १२०० रुपये दंडाची वसुली होत असल्याची बाब शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. प्रत्येक टीसीला टार्गेट दिले जात असतानाही ते कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. विशेष म्हणजे ते काम करीत नसल्याचे प्रशासनानेही मान्य केले आहे. त्यामुळेच आता त्यांना कामाला लावा, वेळ पडल्यास मीसुद्धा महिन्यातून एकदा प्रवाशांची तिकिटे तपासण्याचे काम करण्यास तयार असल्याची माहिती प्रभारी आयुक्त अशोक रणखांब यांनी दिली. परंतु, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांनीही अशा प्रकारे तिकीट तपासण्याचे काम करून परिवहनचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, असेही खडेबोल त्यांनी परिवहन व्यवस्थापकांना सुनावले.मुंब्रा, रेतीबंदरची परिवहन सेवा बंद का केली, बसथांब्यांचे काम का रखडले, असे सवाल शिवसेनेचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी, तर आगारातून शुक्रवारी किती बस निघाल्या, असा सवाल नजीब मुल्ला यांनी केला. त्यावर माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिले. गुरुवारी किती बस आगारातून निघाल्या, याची माहिती मागितली असता १९९ बस रस्त्यावर धावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी १४३ बस रस्त्यावर धावल्याचा गौप्यस्फोट करून मुल्ला यांनी त्यांना तोंडघशी पाडले. परिवहनमधून किती बस बाहेर पडतात, याचीच माहिती व्यवस्थापकांना नसल्याचे या वेळी उघड झाले. एकाच बसची वारंवार दुरुस्ती करून पैशांचा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. केडीएमटी, नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिकांच्या बस ठाण्यात उत्पन्न मिळवत आहेत. परंतु, ठाणे परिवहन सेवा ठाण्याबाहेर जाण्यास का तयार नाही, असा सवाल सुधीर भगत यांनी उपस्थित केला.परिवहनमध्ये ३५ टीसी असून त्यांच्याकडून महिनाकाठी केवळ १२०० रुपयांचाच दंड वसूल होत असल्याचा मुद्दा रामभाऊ तायडे यांनी उपस्थित केला. यावर प्रत्येकाला महिन्याला १५ केसेसचे टार्गेट दिले असून ते वाढवून २० केले होते. परंतु, कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. त्यामुळे सदस्य आक्रमक झाल्याने अखेर प्रभारी आयुक्तांनी त्यांना कामाला लावा, अन्यथा त्यातील कामचुकार टीसी कमी करा, असे आदेश त्यांनी दिले. याशिवाय, मुंब्रा रेतीबंदर बस उद्यापासून सुरू होईल. (प्रतिनिधी)