शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

त्रास सहन करणाऱ्या भिवंडीकरांना आयुक्तांचा ‘सलाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:02 AM

आयुक्त हिरे यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने शनिवारी महापालिकेमार्फत पालिकेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भिवंडी : भिवंडीकरांना सलाम, भिवंडीच्या पदाधिकाऱ्यांना सलाम, भिवंडीत दुरुस्त होणा-या रस्त्यांना सलाम, त्यांचे काम करणा-या कंत्राटदारांना सलाम, त्यापासून त्रास होत असताना, त्रास सहन करत असलेल्या सर्व भिवंडीकर नागरिकांना सलाम, भिवंडीतील अनधिकृत बांधकामांना सलाम, भिवंडीतील अनधिकृत बांधकाम करणा-यांना सलाम, या कामांस सहकार्य करणा-यांना सलाम... अशा शब्दांत महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी शनिवारी प्रशासकीय सेवेचा निरोप घेतला. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘सलाम’ या कवितेवर आधारित स्वरचित कविता सादर करून व्यवस्थेपुढे हात टेकल्याची भावना हिरे यांनी व्यक्त केली.

आयुक्त हिरे यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने शनिवारी महापालिकेमार्फत पालिकेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिरे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महापौर जावेद दळवी यांनी गौरव केला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे खा. कपिल पाटील, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, विरोधी पक्षनेते श्याम अग्रवाल, स्थायी समिती सभापती मदन नाईक, गटनेते विलास पाटील, निलेश चौधरी, संजय म्हात्रे व संतोष शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. हिरे यांना निवृत्तीपूर्वी भिवंडीतील नियुक्ती प्राप्त झाली. तेथील रस्ते कंत्राटदार, अनधिकृत बांधकाम करणारे माफिया अशा अनेक गोष्टींकडे कानाडोळा करणारे पदाधिकारी यांना हिरे यांनी निरोपाच्या भाषणात ‘सलाम’ कवितेतून चपराक लगावली.

हिरे म्हणाले की, आयुक्तपदाचा पदभार घेतला, तेव्हा अनेक प्रश्न प्रलंबित होते. ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, १०० एमएलडी पाणीपुरवठा योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम माझ्या कारकिर्दीत पूर्ण होऊ शकले नाही. यावेळी ऊर्मिला हिरे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. महापौर दळवी म्हणाले की, महापालिकेत आयुक्त म्हणून हिरे रुजू झाले तेव्हापासून त्यांनी विकासाची कामे करण्याचे निर्णय झटपट घेतले. हिरे यांच्या पूर्वीच्या काळातील अनेक रखडलेली कामे पूर्ण करण्यात आयुक्तांनी पुढाकार घेतला. रस्ते, एलईडी पथदिवे, स्वच्छता अभियान, पंतप्रधान आवास योजना आदी महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले.प्रशासन - लोकप्रतिनिधींचा ताळमेळ हवा- आयुक्त हिरे यांनी सर्व पदाधिकारी व शहरातील प्रमुख सामाजिक संघटनांना विश्वासात घेऊन काम केले. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा चांगला ताळमेळ असेल, तर विकासाची कामे होतात.हिरे यांनी खासदार या नात्याने अनेक प्रकरणांचा पाठपुरावा माझ्याकडे केला, असे खा. कपिल पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी राजे यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी केले.

टॅग्स :thaneठाणे