उल्हासनगर : कॅम्प नं-३, हिराघाट बोटक्लब येथील टेम्पो वाहनस्थळाची आयुक्त अजीज शेख यांनीं पाहणी करून वाहतूक कोंडी झाल्यास कारवाईचा इशारा दिला. हिराघाट येथील टेम्पो वाहनस्थळाला अधिकृत म्हणून घोषणा करण्याची मागणी वाहनचालकांनी केली.
उल्हासनगरात अधिकृत ट्रक, ट्रॅव्हल बस, टेम्पो, कार आदी अवघड वाहनांसाठी अधिकृत वाहनस्थळ नसल्याने, मिळेल त्याठिकाणी वाहने पार्किंग केल्या जातात. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिराघाट बोटक्लब याठिकाणी टेम्पो वाहनस्थळ निर्माण झाले असून त्यांनी त्याठिकाणी कार्यालय थाटले आहे. तसेच महापालिकेच्या बोटक्लब मैदानाचा कब्जा एका खाजगी ठेकेदारांने, घेतल्याचा आरोप होत आहे. महापालिकेने त्याठेकेदाराला अधिकृत परवानगी दिली का? दिली असेलतर भाडे।किती? परवानगी दिली नसल्यास दंड अथवा शुल्क आकारले का? आदी प्रश्नही निर्माण झाले. हिराघाट बोटक्लब येथील टेम्पो वाहन स्थळाचा आयुक्त अजीज शेख, सहायक आयुक्त गणेश।शिंपी, विनोद केणी यांनी शुक्रवारी पाहणी करून वाहतूक कोंडी होऊल अशी पार्किंग करू।नका. असे निर्देश देऊन कारवाईचे संकेत दिले.
शहरातील हिराघाट, सपना गार्डन, शांतीनगर येथील वालधुनी नदी पूल, काजल पेट्रोल पंप, डॉल्फिन क्लब रोड, शहाड रेल्वे स्टेशन व मुरबाड रस्ता, कैलास कॉलनी, कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरील साईबाबा मंदिर, नेताजी गार्डन परिसर, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्ता, श्रीराम चौक पेट्रोल पंप परिसर आदी ठिकाणी अवैधपणे ट्रॅव्हल बस, ट्रक, टेम्पोसह कार अवैधपणे उभ्या केल्या जात आहेत. या अवैध पार्किंग स्थळावरील वाहनावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांना कडून होत असून शुल्क अथवा दंड आकारल्यास महापालिकेला लाखोंचे उत्पन्न होणार असल्याचे बोलले जात आहे.