शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांवर समितीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:19 AM

येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची मंडप उभारण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. परंतु,

ठाणे : येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची मंडप उभारण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. परंतु,न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशानुसार अधिकचा मंडप उभारला गेला, रस्त्यावर खड्डे केले, मंडपाची उंची ३० फुटांपेक्षा जास्त झाली किंवा इतर काही नियम मोडण्याचा प्रयत्न करणाºया शहरातील लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांवर वॉच ठेवण्यासाठी, पालिका स्तरावर एक मुख्य समिती आणि प्रभाग समितीनिहाय १० समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.परंतु, या १० समित्यांकडून योग्य निर्णय येईलच अशी श्वावती नाही. त्यामुळे मुख्य समिती शहरातील सुमारे ५५० हून अधिक मंडपापर्यंत पोहण्यात यशस्वी होईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.उत्सवा दरम्यान रस्त्यावर उभारल्या जाणाºया मंडपासाठी दोन वर्षापूर्वी आदर्श आचारसंहिता म्हणजे सुधारीत धोरण ठाणे महापालिकेने तयार केले आहे. त्याला महासभेने मंजुरी दिली आहे. यानुसार एक तृतीआंश जागेत मंडप उभारणीला परवानगी देण्याचे निश्चित केले आहे. परंतु,असे असले तरीदेखील मागील वर्षी अनेक मंडळांनी या आचारसंहितेचे उल्लघन केले होते. त्यामुळे पालिकेने आणि पोलिसांनीदेखील शहरात सुमारे ४५० नोटीसा बजावून अनेक मंडळांना एक लाखांची नोटीस बजावली होत्या. परंतु, याला शिवसेना आणि राष्टÑवादीने विरोध केल्याने पालिकेने या नोटीसा मागे घेतल्या होत्या.