वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव हे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे केली आहे. या तक्रारींमुळे आरोग्य विभागात प्रचंड खळबळ माजंली आहे.
महिला कर्मचारी रुग्णालयात कामावर असताना त्यांना दूरध्वनी करून वारंवार वैद्यकीय अधिकारी कक्षात बोलावणे, रात्री कामावर असताना घरी बोलावून घेणे, दारू पिऊन कर्मचारी व रुग्णांशी असभ्य वर्तन करणे, लैंगिक शोषण करणे असे गंभीर आरोप तक्रारीत आहेत. या तक्रारींची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीवर दहा कर्मचाºयांच्या स्वाक्षºया आहेत. या अर्जाच्या चौकशीसाठी गुरुवारी डॉ. प्रदीप जाधव यांना बोलावले असल्याचे वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.कोविड कालावधीमध्ये महिला कर्मचाºयांची ड्युटी लावल्याने त्याच्या रागातून हा आरोप माझ्यावर केला आहे. आमचे वरिष्ठ अधिकारी यासुद्धा महिला अधिकारी असताना त्यांच्याकडे तक्रार न करता थेट पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करणे, हा माझ्यविरुद्ध कट आहे. सहा वर्षे मी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहे. सहा वर्षांत मी त्रास दिला म्हणून महिला कर्मचाºयांनी आपल्या पती किंवा मुलांकडे कधी का तक्र ार केली नाही?- डॉ. प्रदीप जाधव, वैद्यकीय अधीक्षक, वाडा