शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

एमएमआर क्षेत्रामधून कोरोनाचे पूर्णत: निर्मूलन हेच प्रमुख लक्ष्य - डॉ. श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:18 AM

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये आणि क्वारंटाइन सेंटर उभी केली. कोविड रुग्णांची ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी प्रयत्न केले.

माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात कळवा-मुंब्रा, डोंबिवली शहर, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ही शहरे दाट लोकवस्तीची आहेत. दाट लोकवस्तीत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. मात्र, गेल्या पाच महिन्यांत पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्यामुळे आता कोरोना माझ्या मतदारसंघासह एमएमआर क्षेत्रामध्ये आटोक्यात येत आहे. कोरोनाच्या केस झीरो करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. चीनसारख्या देशात कोरोनाशी सामना करण्याकरिता एक हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याठिकाणी रुग्णालये असतानाही नवे रुग्णालय उभे केले. त्यातून बोध घेऊन कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये आणि क्वारंटाइन सेंटर उभी केली. कोविड रुग्णांची ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी प्रयत्न केले.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात महापालिकेचा निधी खर्च न करता एमसीएचआयच्या माध्यमातून एक हजार बेडचे कोविड रुग्णालय सुरू केले. त्या ठिकाणी रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले रुग्णालय कायमस्वरूपी रुग्णालयात रूपांतरित करा, अशी मागणी केली जात आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात रुग्णांना क्वारंटाइन करण्याकरिता मोठी वास्तू नव्हती. भिवंडी बायपास सर्कलला असलेल्या ‘टाटा आमंत्रा’ या वास्तूत सोय करण्यात आली. त्याठिकाणी तीन ते चार हजार रुग्णांची दररोज जेवण, नाश्त्याची सोय केली जात आहे. एक मेगा किचन चालवले जात असून औषधे व डॉक्टरांची सोय केली आहे. ही उल्लेखनीय बाब आहे.अंबरनाथ पालिकेने प्रथम ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले. २०० बेडचे कोविड डेडिकेटेड रुग्णालय सुरू करण्याचे काम सुरू आहे. केडीएमसी हद्दीत शास्त्रीनगर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केले. बेडची कमतरता जाणवू नये, याकरिता होलिक्रॉस, नियॉन, आर.आर. ही तीन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करून कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले. सुरुवातीला महापालिकेने कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले. त्यानंतर, कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पिवळ्या व केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना महात्मा फुले आरोग्य योजनेंंतर्गत उपचार केले. आजघडीला कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत खाजगी २४ कोविड रुग्णालये आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने कोविड रुग्णांना बेड मिळत नसल्याने डोंबिवली क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृहात २०० बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू केले. डोंबिवलीत पाटीदार भवनात २०० बेडची सुविधा सुरू केली. लवकरच जिमखान्यात कोविड रुग्णालय व कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील आर्ट गॅलरीत कोविड रुग्णालय सुरू केले जाणार आहे. त्याठिकाणी ५०० बेडची व्यवस्था आहे. कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात आसरा फाउंडेशनच्या पुढाकाराने काळसेकर शाळेत कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये आॅक्सिजन व आयसीयू सुविधा आहेत. कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांना नियॉन रुग्णालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. उल्हासनगरातही खाजगी रुग्णालयांची मदत घेऊन कोरोनावर मात करण्याचे काम सुरू केले. टाउन हॉलमध्ये कोविड रुग्णालय सुरू केले. त्याचबरोबर रिजन्सी प्लाझा येथे साई प्लॅटिनम रुग्णालयाने कोविड रुग्णालय सुरू केले. याशिवाय, कल्याण-मुरबाड रोडवरील वरप गावात राधास्वामी सत्संगने दिलेल्या जागेत कोविड केअर सेंटर उभे केले जात आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मदतीने हे कोविड केअर सेंटर उभे केले जात आहे. वरपचा परिसर माझ्या मतदारसंघात येत नाही. मात्र, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. त्याचवेळी टेस्टिंगचा रेशो वाढवणे, टेस्टिंगसाठी लॅब उभी करणे आवश्यक होते. कल्याणच्या गौरीपाडा येथे पीपीई तत्त्वावर कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यापर्यंत यशस्वी पाठपुरावा केला. क्रेष्णा डायग्नोस्टिकने सुरू केलेल्या या लॅबचा उपयोग कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांसह अन्य रुग्णांनाही होतोय. कम्युनिटी क्लिनिक्स, तापाचे दवाखाने सुरू केले. त्याचबरोबर मोफत अ‍ॅण्टीजेन टेस्ट सुरू केली. खाजगी लॅबमध्ये कोरोना टेस्टकरिता २५०० ते २८०० रुपये खर्च येत होता. महापालिकेच्या लॅबमुळे रिपोर्ट लवकर हाती येऊ लागले व तातडीने उपचार सुरू झाले.पहिल्या टप्प्यात महापालिकेने १० हजार अ‍ॅण्टीजेन किट खरेदी केले. आणखी ५० हजार किट घेणार आहे. थर्मल स्क्रिनिंग, तापाच्या रुग्णांची तपासणी, सर्वेक्षणातून रुग्ण शोधमोहिमेवर महापालिकांनी जोर दिला. कोरोनाच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांना रेमडेसिवीर आणि टोकलीझुमॅब ही महागडी इंजेक्शन द्यावी लागतात. रुग्णांना परवडत नसलेली ही इंजेक्शने खरेदी करणारी केडीएमसी ही पहिली महापालिका होती. ही इंजेक्शने ेमहापालिका कोविड रुग्णालयातील रुग्णांना मोफत दिली.कोरोना रुग्णांची संख्या सुरुवातीला जास्त असल्याने डॉक्टर, नर्सची आवश्यकता होती. कल्याण-डोंबिवलीत व अन्य ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशन पुढे आली. डोंबिवलीत तर त्यांच्या सेवेचा एक वेगळा ‘डोंबिवली पॅटर्न’ निर्माण झाला. हा पॅटर्न राज्यभरात राबवला जावा, असे मला सरकारला सुचवायचे आहे.पालकमंत्री शिंदे यांंच्याकडे नगरविकास खाते असल्याने त्यांनी केडीएमसीला १७ कोटी, ठाणे महापालिकेस १० कोटी, उल्हासनगर व अंबरनाथ महापालिकेस प्रत्येकी सात कोटी निधी दिला. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. कल्याण-डोंबिवलीत रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १७ दिवसांवरून ६५ दिवसांवर पोहोचला. नगरपालिकांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्के आहे. राज्याचा मृत्युदर २.३ टक्के आहे, तर एमएमआर रिजनमध्ये हाच दर १.५ टक्क्यांवर आला आहे. एमएमआर रिजनमध्ये मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत. आदित्य यांनी कोविडकाळात रस्त्यावर उतरून, बैठका घेऊन खूप काम केले. अनलॉकनंतर हळूहळू काही गोष्टी सुरू केल्या आहेत. मात्र, सगळे एकदम सुरू केल्यास पुन्हा कोरोना डोके वर काढू शकतो. नागरिकांनीही त्यांची जीवनशैली बदलायला हवी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर केला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग राखले पाहिजे. कोरोनाचे चक्र तोडण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे.आरोग्यावर बांगलादेश व श्रीलंकेपेक्षा कमी खर्च भारत करतो, ही बाब संसदेत यापूर्वीच मांडली आहे. आरोग्यावरील खर्च वाढवण्याची गरज आहे. केंद्र सरकार कोरोना संकटातून धडा घेऊन त्यात वाढ करेल, अशी मला नक्कीच खात्री आहे.(शब्दांकन : मुरलीधर भवार)

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे