ठाणे : ठाणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाच्या रु ग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ होत आहे. असे असले तरी यावर मात करण्याचे प्रमाण हे ४१ टक्यांच्या आसपास आहे. दिवसागणिक कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या वाढत असल्याने महापलिका प्रशासनाने शहरातील अनेक भाग टप्याटप्याने बंद करीत होती. परंतु तरीदेखील कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या वाढत असल्याने आता ३१ मे र्पयत महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितीमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. तशा आशयाचे परिपत्रक प्रत्येक प्रभाग समिती मार्फत काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही प्रभाग समितींमध्ये अत्यावश्यक सामानांसाठी होम डिव्हीलवर ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी केवळ दुध आणि मेडीकलच सुरु राहितील असे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे शहरात मागील २६ दिवसात कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या झपाटयने वाढतांना दिसत आहे. २१ मार्च ते एिप्रल अखेर शहरात कोरोनाचे 3क्क् रु ग्ण होते. मात्र १ मे ते २६ मे या कालावधीत रु ग्णांची संख्या ही तब्बल १९९४ ने वाढली आहे. त्यामुळे ठाणोकरांची चिंता आणखीनच वाढत आहे. महापालिकेच्या १० प्रभाग समितींमध्ये कोरोनाचे रु ग्ण आढळून आले आहेत. परंतु यामध्ये हिट लिस्टमध्ये लोकमान्य नगर सावरकर नगर ही प्रभाग समिती असून येथील रु ग्णांची संख्या ही मंगळवार्पयत ६४९ हून अधिक झाली आहे. त्या खालोखाल वागळे प्रभाग समितीत ३५२ रु ग्ण आहेत. तर मुंब्रा प्रभाग समितीत २९८ रु ग्ण आढळून आले आहेत. तर कळवा प्रभाग समितीत २०६, नौपाडा कोपरीत २६४ आणि इतर प्रभाग समितींमध्ये देखील १०० हून अधिक रु ग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या १० प्रभाग समित्या आता हायरिस्कमध्ये आल्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये झोपडपटटीचा भाग अधिक असून येथे दाटीवाटीने घरे आहेत. त्यामुळे सुरवातीला पालिकेने मुंब्य्रात लॉकडाऊन घेतले होते. त्यानंतर इदमुळे येथील लॉकडाऊन शिथील करण्यात आला होता. आता पुन्हा येथे लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यानंतर लोकमान्य आणि वागळेमध्ये वाढती रु ग्ण संख्या नजरेसमोर ठेवून पालिकेने मागील काही दिवसापासून पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केले आहे. तिकडे कळव्यातही कोरोनाची वाढती रु ग्ण संख्या लक्षात घेता कळव्यातही टाळेबंदी करण्यात आली आहे. दिव्यातही तसाच प्रकार असल्याने येथेही लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर कोपरी आधी ग्रीन झोन होती, त्यावेळेसही येथील सेवा बंद होत्या. परंतु आता त्याचाही रेड झोनमध्ये समावेश झाल्यानंतर येथील सेवा निर्धारीत वेळेत सुरु आहेत. परंतु आता तेथेही ३१ मे र्पयत पूर्णपणो लॉकडाऊन करण्यात आले आहे. तिकडे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत कोरोनाचे १२४ रु ग्ण आढळले असून येथेही आता पुन्हा तिसऱ्यांदा ३१ मे र्पयत लॉकडाऊन घेण्यात आला आहे. एकूणच आता जवळ जवळ प्रत्येक प्रभाग समितीत कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने येत्या ३१ मे पर्यंत सर्वच १० प्रभाग समित्या पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु राहणार असून नागरीकांना सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे, काही ठिकाणी होम डिलीव्हरी ठेवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी केवळ दुध आणि मेडीकलची दुकाने सुरु राहणार आहेत. त्यामुळे आता येत्या ३१ मे र्पयत संपूर्ण ठाणो शहरच आता लॉकडाऊन असणार आहे.
महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितींमध्ये ३१ मे र्पयत पूर्ण लॉकडाऊन, कोरोना रु ग्ण २ हजारांच्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 3:51 PM