ठाणे : सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनसीआरविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्र वारी बंद पुकारला होता. याच अनुषंगाने ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचेठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीनहातनाका आणि ब्रह्मांड येथे रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे काही वाहतूककोंडी झाली होती. एकंदरीत या बंदला ठाण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात बंदचे आवाहन केले होते. त्याला ठाणे शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरात शुक्र वारी सकाळीच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वागळे इस्टेट आणि परिसरात दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. तर, तीनहातनाका येथे राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, संजय मिरगुडे, श्यामसुंदर सोनार, मोहन नाईक आदींच्या नेतृत्वाखाली सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला. तर, ब्रह्मांडनाका येथेही काहीकाळ रास्ता रोको केले. कळवा येथेही वंचितच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यकर्त्यांचे सामंजस्य वंचितच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या सामंजस्यामुळेही कुठेही अनुचित प्रकार घडले नाहीत.मुंब्य्रात महाराष्ट्र बंदला शून्य प्रतिसादमुंब्रा : सीएए, एनसीआर या मुद्यावरून मुंब्य्रात मागील काही दिवसांपासून धरणे, मोर्चे आदी प्रकारची आंदोलने सुरू आहेत. परंतु, या तसेच इतर काही मुद्यांवर बहुजन वंचित आघाडीने शुक्र वारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मात्र येथील नागरिकांनी शून्य प्रतिसाद दिला. यामुळे येथील संजय नगर,अमृतनगर,आनंद कोळीवाडा,कौसा,स्टेशन परिसर,शिवाजीनगरातील दैनंदिन व्यवहार, शाळा,महाविद्यालये तसेच रिक्षा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती.
वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद, दुकानांसह वाहतूक सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 1:12 AM