शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ठामपाने राबविली सर्वंकष स्वच्छता मोहीम; अतिरिक्त आयुक्तांचा समावेश

By जितेंद्र कालेकर | Published: June 07, 2024 6:02 PM

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडून साफसफाई अभियानाची पाहणी

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत शुक्रवारी सकाळी दिवा प्रभागात स्वच्छता करण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शीळफाटा-महापे चौक येथील साफसफाई अभियानात सहभागी होऊन परिसराची स्वच्छता केली. तसेच, प्रभागातील स्वच्छता मोहिमेची पाहणीही केली.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार करण्यात येत असलेल्या या मोहिमेची सुरूवात शीळफाटा चौक स्वच्छ करण्याने झाली. रोडे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

या मोहिमेत, दिवा आणि परिसरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक, रस्ते दुभाजक यांची स्वच्छता करण्यात आली. दुकानांसमोर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी यावेळी दिले. या मोहिमेनंतर, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील नाले सफाईचीही पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली.

टॅग्स :thaneठाणे