शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

दोन चटईक्षेत्रावरून जुन्या ठाण्यातील नागरिकांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:58 PM

कोणत्या भागाला नेमका कसा फायदा होईल, याबाबत संभ्रम असल्याने त्यावरच आता चर्चा सुरू आहे.

ठाणे : जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाच्या मार्गातील अडथळे आता एकेक करून दूर होऊ लागले असून आता ३० वर्षे जुन्या इमारतींना प्रोत्साहनपर जादा चटईक्षेत्र देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतल्यानंतर आता मागील कित्येक वर्षांची दोन एफएसआयची मागणीदेखील मार्गी लागली आहे. परंतु, जुन्या ठाण्यात दाटीवाटीचे क्षेत्र आणि रेसिडेन्शिअल झोन असे भाग आहेत. शिवाय, यातील काही भाग गावठाणांमध्येही जात आहे. त्यामुळे येथील कोणत्या भागाला नेमका कसा फायदा होईल, याबाबत संभ्रम असल्याने त्यावरच आता चर्चा सुरू आहे.जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी शिवसेना, भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. एकीकडे क्लस्टर मंजूर झाले असताना जुन्या ठाण्यावर मात्र पुनर्विकासाची टांगती तलवार कायम आहे.शहरातील म्हणजेच ठाणे पूर्व ते माजिवडा सेक्टर १ ते ३ हे भाग जुने ठाणे म्हणून ओळखले जातात. या भागातील बहुतांश इमारती अधिकृत तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका काळातील असल्याने पुनर्विकासाचा मार्ग खडतर झाला आहे. यासाठी शिवसेना आणि भाजपाचा शासनाकडे पत्रव्यवहार सुरू होता.गावठाणांचे काय?आता मात्र शासनाने दोन एफएसआय मंजूर केल्याने याचा लाभ रेसिडेन्शिअल झोनलाच अधिक होणार आहे. यापूर्वी रेसिडेन्शिअल झोनसाठी प्रोत्साहनपर चटईक्षेत्र पकडून १.६५ एफएसआय मिळत होता. आता दोन एफएसआयमुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.परंतु, या भागात चरई, सुभाष पथाचा काही भाग यासह इतर काही परिसर गावठाणांमध्ये मोडत आहे. त्यामुळे हा भागही यातून वगळला जाणार आहे. एकूणच या वाढीव एफएसआयचा नेमका कोणत्या भागाला कसा फायदा होईल, हे सर्व्हेनंतरच स्पष्ट होणार आहे.तीनऐवजी दोन चटईक्षेत्रावर बोळवणमागील महिन्यात अधिसूचना जारी करून पूर्वीच्या २० वर्षांचा असणारा कालावधी बदलून ३० वर्षांपूर्वीच्या इमारतींना ०.१५ किंवा ०.५ इमारतींना प्रोत्साहनपर जादा चटईक्षेत्र मंजूर केले. परंतु, ३० वर्षांपूर्वीच्या धोकादायक इमारतींना दोन चटईक्षेत्र द्यावे, यासाठी प्रयत्न सुरू होते.अखेर, शुक्रवारी नागपूर अधिवेशनात शासनाने जुन्या ठाण्याला दोन एफएसआय देण्याची घोषणा केली. परंतु, जुने ठाणे हे ठाणेपूर्व ते माजिवडा सेक्टर १ ते ३ अशा भागांत विभागले आहे. त्यातही दाटीवाटीचे क्षेत्र आणि रेसिडेन्शिअल झोन असे दोन भाग येथे आहेत. दाटीवाटीच्या क्षेत्रासाठी दोन एफएसआय मिळत आहे. परंतु, येथे तीन एफएसआय मिळावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :thaneठाणे