शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

ठाण्याच्या महासभेत गोंधळ : सहा महिन्यांपासून पाणीबाणी असल्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:56 AM

घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले.

ठाणे : घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले. घोडबंदरच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरात पाणीवितरणातील अनियमिततेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र खडताळे यांनी दिली.घोडबंदर भागातील वाढत्या बांधकामांवर पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने बंदी लागू केली आणि ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले. परंतु, घोडबंदरसह संपूर्ण ठाणे शहराला २०४० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने सादर केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने घोडबंदरची बांधकामबंदी उठवली.शुक्रवारच्या महासभेत पालिकेचा दावा अक्षरश: फोल ठरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी वागळे पट्ट्यासह लोकमान्यनगर भागात मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू असल्याचे सांगितले. ही समस्या सुटावी, म्हणून वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, आजही या भागाची पाण्याची समस्या का सुटली नाही, असा सवाल उपस्थित केला. नजीब मुल्ला म्हणाले की, शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्या व प्रतिमाणशी पाणी देण्याचे मापदंड यांचा विचार करता उपलब्ध पाणी तब्बल २२ टक्के अधिक आहे. असे असतानाही ठाण्याला पाण्यासाठी वणवण का करावी लागते, असा सवाल त्यांनी केला. अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाणीपुरवठा अनियमित असून पूर्वी एक तास येणारे पाणी आता अवघे १० मिनिटेच येत असल्याचे निदर्शनास आणले. मुंब्रा येथे पाण्याची समस्या तीव्र असल्याची बाब नगरसेवक शानू पठाण यांनी निदर्शनास आणली. अशोक वैती यांनी त्यांच्या परिसरातील नागरिक तब्बल ४२ वर्षे शुद्ध न केलेले (रॉ वॉटर) पाणी पित असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर उपाययोजना केल्या जात असल्याचे बोलले जाते. परंतु, अद्यापही योग्य ती कार्यवाही का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भरत चव्हाण, अनिता गौरी, मालती पाटील, संजय भोईर, शैलेश पाटील आदी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला पाण्याच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेWaterपाणी