शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 5:22 AM

शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असतानाच काही स्वयंसेवी संस्था मराठी शाळा जगवण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्रही गेल्या १५ वर्षांपासून ‘मातृभाषेतून शिकण्यासाठी मराठी टिकवण्यासाठी’ जनजागृती करते आहे.

- महेंद्र सुकेठाणे : शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असतानाच काही स्वयंसेवी संस्था मराठी शाळा जगवण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्रही गेल्या १५ वर्षांपासून ‘मातृभाषेतून शिकण्यासाठी मराठी टिकवण्यासाठी’ जनजागृती करते आहे. याच जनजागृतीला व्यापक स्वरूप देऊन येत्या २४ आणि २५ डिसेंबरला मुंबईत ‘मराठीप्रेमी पालकांचे महासंमेलन’ पहिल्यांदाच भरवले जात आहे.मातृभाषा शिक्षणाचे महत्त्व जगभर निर्विवाद सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळांचेसंवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून या संमेलनात जनजागृतीची मोट बांधली जाणार आहे. मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा आहेत आणि मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा जगेल, त्यासाठी आयोजकांनी हे संमेलन भरवण्याचे ठरवले आहे.या संमेलनात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार ते पालघर, डहाणू इथल्या शाळांचे मिळून जवळपास २० हजार पालक व इतर नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रयोगशील शिक्षणासाठी काम करणारे मान्यवर, अभ्यासक, राजकीय नेते, साहित्य-सिने-नाट्य-क्षेत्रातील दिग्गजांची व्याख्याने आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून यासंमेलनात मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याची गरज पटवून देणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतील प्रयोगशील शाळा, शालोपयोगी वस्तू विक्री करणाºया कंपन्या, प्रकाशकांची ग्रंथप्रकाशने, मराठी भाषेसाठीकाम करणाºया विविध संस्था/ संघटनांची माहिती देणारी दालने असे अनेक स्टॉल्स या महासंमेलनात असणार आहेत.या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतील शाळांत शिक्षणविषयक जे प्रवाह, पद्धती राबवल्या जात आहेत, त्यांवर आधारित ‘मराठी शाळा विशेषांक’ही प्रकाशित करण्यात येणार आहे. मराठी शाळांमधून शिक्षण घेऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रांत नामवंत झालेल्या व्यक्तींचे अनुभवकथन पालक आणि नागरिकांना मातृभाषेतून शिक्षण घेण्याची प्रेरणा देतील, असा विश्वास आयोजकांना आहे.जनजागृतीसाठी फेसबुक पेजचा आधार‘मराठी अभ्यास केंद्र’ नावाने एक फेसबुक पेज तयार करण्यात आले असून या महासंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी अभ्यास केंद्र मराठीप्रेमी सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन उभी केलेली संस्था असून आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी ती काम करते आहे. या महासंमेलनाचे स्थळ लवकरच निश्चित होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रा.डॉ. वीणा सानेकर आणि आनंद भंडारे या उपक्रमाचे प्रकल्प समन्वयक आहेत.

टॅग्स :thaneठाणेmarathiमराठी