भिवंडी लोकसभा लढविण्यावर काँग्रेस ठाम - महेंद्र घरत
By नितीन पंडित | Published: April 6, 2024 06:47 PM2024-04-06T18:47:00+5:302024-04-06T18:48:01+5:30
शनिवारी भिवंडीत कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन कारण्यताली होते यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत घरत बोलत होते.
भिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्यावर काँग्रेस ठाम असून पक्ष आमच्या भूमिकेचा विचार करून आम्हाला नक्कीच न्याय देईल अशी प्रतिक्रिया रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी भिवंडीत दिली आहे. शनिवारी भिवंडीत कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन कारण्यताली होते यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत घरत बोलत होते.
या बैठकीस भिवंडी प्रभारी सुभाष कानडे,माजी खासदार सुरेश टावरे,ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,माजी आमदार खलिफा,प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे,तारीक फारुखी,प्रदीप पप्पू राका,राणी अग्रवाल ,मनीष गणोरे,माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांसह असंख्य तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडीत संपूर्ण कोकण पदाधिकारी एकवटले आहेत.आम्ही सुरवाती पासून कोकणात दोन जागांवर आग्रही होतो.भिवंडी आम्ही सोडणार नाही हा संदेश वरिष्ठांना दिला होता.परंतु कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस नामशेष करण्याचा घाट घातला असून भिवंडीचा तिढा वरिष्ठांनी सोडवायचा आहे. त्यावर निर्णय न घेतल्यास आम्ही काम करणार नाही आम्ही दुसऱ्यांच्या पालख्या उचलणार नाही असा इशारा देखील महेंद्र घरत यांनी यावेळी दिला आहे.
दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी शरद पवार यांना समजावयाचे आहे. त्यामुळे काँग्रेसला कार्यकर्ते हवे असतील तर भिवंडीत काँग्रेस पक्षाने चिन्ह वरिष्ठांनी दिलेच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. पक्षातील वरिष्ठांनी आश्वासन दिले असताना भिवंडी काँग्रेस नाही लढली तर याचा परिणाम काँग्रेस कार्यकर्त्यांवर होऊन सर्व राजीनामे देणार असल्याचं इशारा देत सर्व पदाधिकारी यांनी दयानंद चोरघे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम आहेत असा निर्वाळा अखेर महेंद्र घरत यांनी दिला.
पक्षातील सर्व पदाधिकारी यांना वरिष्ठांना न्याय द्यायचा आहे,त्यामुळेच नाना पटोले भिवंडीच्या मुद्द्यावर बैठक सोडून निघून गेले,आम्ही आज ही आशावादी असून काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आम्हाला न्याय देतील अशी भूमिका काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी विषद करीत ,संजय राऊत यांनी भिवंडी लोकसभा काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकू शकते यावर प्रतिक्रिया देताना दयानंद चोरघे यांनी संजय राऊत यांचा अभ्यास कमी असल्याचे स्पष्टीकरण चोरघे यांनी दिली आहे.