- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी महापालिका रुग्णालयाला पुरविण्यात येणाऱ्या साहित्य व वस्तूच्या किमती बाबत आक्षेप घेऊन, वस्तूच्या दराला महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना जबाबदार धरून ११ कोटीच्या प्रस्तावाला समिती सभेत मंजुरी दिली. अशी माहिती सभापती सिरवानी यांनी दिली असून अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता झाला नाही. (Congress aggressive; Ulhasnagar Municipal Corporation hospital materials in dispute?)
उल्हासनगरात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ४०० खाटाचे रुग्णालय उभारणार आहे. त्यापैकी २०० खाटाचे स्वतःचे रुग्णालय महापालिका रिजेन्सी अंटेलिया येथे उभारणार असून दोन रुग्णालय, लॅब व ऑक्सिजन प्लॅन्ट साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत कोरोना आपत्कालीन स्थिती बघून मंजुरी देण्यात आली. असे मत स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनीं दिली. तसेच वस्तूच्या दराची जबाबदारी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्यावर टाकली. सभापती सिरवानी हे स्वतः दोन उशी घेऊन सभेत गेले होते. त्यांनी या उशीची किंमत ९०० रुपये आहे का? असा प्रश्न आयुक्तांना करून वस्तूच्या किंमतीवर प्रश्नचिन्हे निर्माण केले. दरम्यान खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूची किंमत अव्वाच्या सव्वाच्या असल्याची कुजबुज शहरात सुरू झाली.
महापालिकेच्या बंद पडलेल्या आरोग्य केंद्रातील ५०० पेक्षा जास्त बेड, गाद्या, उशी, चादर पडून असताना नवीन खरेदी कशासाठी? असा उपस्थित झाला. खरेदी करण्यात येणार असलेल्या एका गादीची किंमत १० हजार, बेड-१९ हजार ५००, उशी- ९००, चादर व बेडशीट प्रत्येकी-६०० तर उशी कव्हर १८० रुपये दाखविण्यात आली. इतर वस्तूच्या किंमतीही अश्याच सव्वाच्या सव्वा असल्याची टीका होत आहे. काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी वस्तूच्या किमतीवर प्रश्नचिन्हे उपस्थिती करून वस्तू ई-टेंडर नुसार थेट कंपनीकडून मागवून महापालिका व शासनाचे पैसे वाचवा. असे पत्र महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महापालिका सचिवांना दिले. एकूणच अव्वाच्या सव्वा किमतीच्या वस्तू खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी दिली असलेतरी वस्तूच्या किमती बाबत उलटसुलट चर्चेला सुरवात झाली. अखेर...रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण महापालिका दोन रुग्णालय, लॅब व ऑक्सिजन प्लॅन्ट साठी खरेदी करण्यात येत असलेल्या ११ कोटीच्या साहित्य व वस्तूवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. तर दुसरीकडे महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने राजकीय सर्वपक्षीय नेते, पालिका अधिकारी, नागरिक, सामाजिक संस्था आदींनी आनंद व्यक्त केला. शहरवासीयांना हक्काचे रुग्णालय मिळणार असून रुग्णालयात अध्यावत सुखसुविधा राहण्याचे संकेत महापालिका अधिकार्यांच्या दिले.