काँग्रेस नगरसेवकाच्या घराच्या दरवाज्यावर अज्ञाताने पेट्रोल ओतून लावली आग,  घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 03:48 PM2018-02-03T15:48:37+5:302018-02-03T15:50:31+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार यांच्या घराच्या दरवाज्यावर शनिवारी (2 फेब्रुवारी) मध्यरात्री 3.20 वाजताच्या सुमारास एका अज्ञाताने पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिल्याची घटना घडली.

Congress corporator's house burned by unknown person | काँग्रेस नगरसेवकाच्या घराच्या दरवाज्यावर अज्ञाताने पेट्रोल ओतून लावली आग,  घटना सीसीटीव्हीत कैद

काँग्रेस नगरसेवकाच्या घराच्या दरवाज्यावर अज्ञाताने पेट्रोल ओतून लावली आग,  घटना सीसीटीव्हीत कैद

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार यांच्या घराच्या दरवाज्यावर शनिवारी (2 फेब्रुवारी) मध्यरात्री 3.20 वाजताच्या सुमारास एका अज्ञाताने पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिल्याची घटना घडली. ती  घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असून जुबेर यांनी त्याविरोधात नयानगर पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. नयानगर येथील पूजा नगर परिसरात असलेल्या मीरास्मृती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये जुबेर आपल्या कुटुंबासोबत अनेक वर्षांपासून राहतात.

शुक्रवारी ते आपल्या पत्नीसह चिपळूण येथील नातेवाईकाच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी गेल्याने घरी त्यांच्या दोन मुलीच होत्या. इमारतीत सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुपबंद करण्यात येत नाही. त्याचाच गैरफायदा घेत एका अज्ञाताने जुबेर यांच्या इमारतीत शनिवारी मध्यरात्री 3.20 वाजताच्या सुमारास प्रवेश करुन त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला बाहेरुन कडी लावून त्यावर प्लास्टिकच्या बाटलीतून आलेले पेट्रोल ओतले व त्याला आग लावली. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

आगीचा भडका उडताच त्या अज्ञाताने त्वरीत इमारतीबाहेर पळ काढला. लावलेल्या आगीत दरवाज्यासह त्यालगतच्या लाकडी शोकेसचे नुकसान झाले आहे. घटनेचे वृत्त इमारतीतील रहिवाशांना समजताच त्यांनी जुबेर यांना त्वरीत संपर्क साधून माहिती दिली. जुबेर यांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य ओळखून घर गाठले. त्यांनी याप्रकरणी नयानगर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. इमारतीतील घटना सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेजवरुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. नयानगर परिसरात गर्दुल्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांचा वावर स्थानिकांना त्रासदायक ठरू लागला आहे. त्यातीलच एका गर्दुल्याने हा प्रकार केल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. 

 

Web Title: Congress corporator's house burned by unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.