अखेर आयुक्तांविरुद्ध 'अविश्वास ठराव', काँग्रेस नगरसेवकाने केली शिवसेनेची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 08:22 PM2019-08-28T20:22:16+5:302019-08-28T20:23:36+5:30

मंगळवारी वेळेअभावी तहकुब झालेली महासभा बुधवारी घेण्यात आली. मात्र, या महासभेला सचिवांसकट एकही अधिकारी हजर राहिला नाही.

Congress councilor slams Shiv Sena's endorsement against commissioners in Thane munciple corporation | अखेर आयुक्तांविरुद्ध 'अविश्वास ठराव', काँग्रेस नगरसेवकाने केली शिवसेनेची कोंडी

अखेर आयुक्तांविरुद्ध 'अविश्वास ठराव', काँग्रेस नगरसेवकाने केली शिवसेनेची कोंडी

googlenewsNext

ठाणे - मंगळवारी झालेल्या महासभेत प्रशासनाच्यावतीने आणण्यात आलेले चुकीचे विषय नामंजुर केल्याने त्याचाच राग मनात धरुन बुधवारी महासभेला एकही अधिकारी हजर राहिला नसल्याचा आरोप सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी या घटनेचा निषेध नोंदविला. मात्र, अशा प्रकारची घटना घडली नसून ही तीसरी वेळ असल्याचे सांगत काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी सायमंड गो बॅकची घोषणा दिली आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला. 

हिम्मत असेल तर हा ठराव मंजुर करा, असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना करीत शिवसेनेची कोंडी केली. अखेर माझे नगरसेवक पद गेले तरी चालेल मात्र चव्हाण यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन देत असल्याची भुमिका शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी मांडून आपल्या पक्षाला सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या संदर्भात विशेष महासभा लावून पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. 

मंगळवारी वेळेअभावी तहकुब झालेली महासभा बुधवारी घेण्यात आली. मात्र, या महासभेला सचिवांसकट एकही अधिकारी हजर राहिला नाही. त्यामुळे अधिकारी गैरहजर राहण्यामागचे कारण काय असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अधिका:यांच्या एका ग्रुपवर त्यांच्या साहेबांकडून मॅसेज आला असून त्यामध्ये महासभेला हजर राहिल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळेच अधिकारी हजर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, आता म्हातारी मेलाचे दुख: नाही, मात्र काळ सोकवत आहे नाही तर तो सोकावला असल्याचे सांगत यापुढे असे घडू देणार नसल्याचा इशारा देत त्यांनी हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी या संदर्भात महापौरांनी आपली भुमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. तर ही सभागृहासाठी लाजीरवाणी गोष्ट असून लोकप्रतिनिधींना आता आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे मत गटनेते नारायण पवार यांनी व्यक्त केले. 

नगरसेवक सभागृहात बोलण्याची इच्छा असूनही बोलायला घाबरतात, आज हा प्रकार घडला नसून यापूर्वीसुध्दा अशा घटना घडल्या असून सुरवातीलाच कडक भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती असे खडे बोलही त्यांनी सुनावले. दरम्यान सभागृहात अशा पध्दतीने गोंधळ सुरु असतांनाच काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी हा महापौरांचा, सभागृहाचा आणि समस्त ठाणेकरांचा अपमान असल्याचे सांगत आयुक्तांच्या विरोधात थेट अविश्वासाचा ठराव मांडला. सायमंड गो बॅकची घोषणा देत तुमच्यात हिम्मत असेल तर हा ठराव मंजुर करा असे थेट आव्हानच त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मी विरोधात बोलतो म्हणून त्याची शिक्षा मी भोगली असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, मी कोणाला घाबरत नाही, मला नेत्याचा फोन येत नाही, त्यामुळे या ठरावाला अनुमोदन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तर यापूर्वी आमच्या बाबतीत असे प्रकार घडले होते, परंतु, त्यावेळेस कोणीही साथ दिली नाही. तेव्हा साथ दिली असती तर आज ही वेळ आली नसती अशी भूमिका भाजपच्या नगरसेविका अर्चना मणोरा, नंदा पाटील यांनी मांडली. तर यापूर्वी प्रशासनाच्या विरोधात भुमिका घेतली म्हणून माङयावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुध्दा झाल्याचा गौप्यस्फोटही भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केला. यापूर्वी सुद्दा असे प्रकार घडले आहेत. मात्र, आजही आपण एकत्र नाही, केवळ पक्षीय राजकारणात गुंतलो आहोत, आपल्यावर आपला विश्वास राहिलेला नाही. निषेध नोंदवितांनाही गोड बोलून निषेध नोंदविला जात आहे, आपण आज बोललो तर उद्या आपल्यावरही गुन्हा दाखल होईल याची भिती मनात बाळगून आहोत, आपण बोलले तर बजेट मिळणार नाही याचीही भिती आहे, पण बजेट आज मिळाले नाही तर ते उद्या मिळणारच आहे अशा काही मुद्यांना हात घालत पाटणकर यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे आजतरी खंबीर निर्णय घ्या अशी मागणी केली.

विरोधक प्रशासनाविरोधात बोलत असतांना शिवसेनेची कोंडी होत होती. परंतु त्या विरोधात बोलण्यास कोणच पुढे सरसावत नव्हता. अखेर माजी महापौर शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी माङो नगरसेवक पद गेले तरी चालेल मात्र चव्हाण यांनी मांडलेल्या या ठरावाला मी अनुमोदन देत असल्याची ठाम भुमिका घेत शिवसेनेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर हा केवळ महापौरांचा अपमान नसून सभागृहाचा अपमान असल्याचे मत भाजपचे नगरसेवक अशोक राऊळ यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचार हा आमचा जन्मसिध्द हक्क असल्याप्रमाणो प्रशासनातील मंडळी वागत आहेत, त्यामुळे त्यांना लगाम घातला गेलाच पाहिजे असे मत व्यक्त करीत त्यांनीही चव्हाण यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन दिले. 

दोन वर्षापूर्वीच ही भुमिका घ्यायला हवी होती - महापौर
आज अधिकारी गैरहजर राहिले म्हणून तुम्ही सगळे प्रशासनाच्या विरोधात बोलत आहात, आजची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही असे प्रकार घडले होते, त्यावेळेसच मी तुम्हाला सांगत होते, सत्ताधारी पक्षात असतांनाही वेळप्रसंगी मी विरोधी बाकावरील नगरसेवकांच्या बाजूनेही बोलली. मात्र एवढे करुनही तुम्ही आयुक्तांच्या गळ्यात गळा घालत असाल तर मी कशाला बोलू असे खडे बोल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्व पक्षीय नगरसेवकांना सुनावले. प्रशासनाकडून आणण्यात आलेल्या चोरीच्या प्रस्तावांना विरोध झालाच म्हणूनच आज ही मंडळी गैरहजर राहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. तुम्ही केलेल्या चो:या नगरसेवकांच्या माथी मारता हे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तडजोड करण्यासाठी महापौर म्हणून मी कधीही आयुक्तांच्या दालनात गेलेली नाही, मी माङया मतावर आजही ठाम आहे. यापूर्वीच जर प्रशासनाला अद्दल घडविली असती तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती, आपणच ही वेळ आपल्यावर ओढावून घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्ही तुमची जागा निश्चित करा, तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा असे सांगतांनाच अविश्वास ठरावासंदर्भात विशेष महासभा लावली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 

इतर कामांमुळे महासभेला दांडी
एकच महासभा पाच पाच दिवस सुरु राहत असल्याने त्याठिकाणी एकाच वेळेस 18 हून अधिकारी अडकून राहत आहेत. त्यात महासभा वेळेत सुरु होत नाही, प्रस्ताव मार्गी लावले जात नाहीत. शिवाय आता येत्या काही दिवसांवर गणोशोत्सव आला आहे, त्यामुळे रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविणो आदींसह इतरही कामे महत्वाची असल्याने महासभेला अधिका:यांना दांडी मारल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.
 

Web Title: Congress councilor slams Shiv Sena's endorsement against commissioners in Thane munciple corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.