शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

अखेर आयुक्तांविरुद्ध 'अविश्वास ठराव', काँग्रेस नगरसेवकाने केली शिवसेनेची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 8:22 PM

मंगळवारी वेळेअभावी तहकुब झालेली महासभा बुधवारी घेण्यात आली. मात्र, या महासभेला सचिवांसकट एकही अधिकारी हजर राहिला नाही.

ठाणे - मंगळवारी झालेल्या महासभेत प्रशासनाच्यावतीने आणण्यात आलेले चुकीचे विषय नामंजुर केल्याने त्याचाच राग मनात धरुन बुधवारी महासभेला एकही अधिकारी हजर राहिला नसल्याचा आरोप सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी या घटनेचा निषेध नोंदविला. मात्र, अशा प्रकारची घटना घडली नसून ही तीसरी वेळ असल्याचे सांगत काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी सायमंड गो बॅकची घोषणा दिली आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला. 

हिम्मत असेल तर हा ठराव मंजुर करा, असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना करीत शिवसेनेची कोंडी केली. अखेर माझे नगरसेवक पद गेले तरी चालेल मात्र चव्हाण यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन देत असल्याची भुमिका शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी मांडून आपल्या पक्षाला सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या संदर्भात विशेष महासभा लावून पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. 

मंगळवारी वेळेअभावी तहकुब झालेली महासभा बुधवारी घेण्यात आली. मात्र, या महासभेला सचिवांसकट एकही अधिकारी हजर राहिला नाही. त्यामुळे अधिकारी गैरहजर राहण्यामागचे कारण काय असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अधिका:यांच्या एका ग्रुपवर त्यांच्या साहेबांकडून मॅसेज आला असून त्यामध्ये महासभेला हजर राहिल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळेच अधिकारी हजर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, आता म्हातारी मेलाचे दुख: नाही, मात्र काळ सोकवत आहे नाही तर तो सोकावला असल्याचे सांगत यापुढे असे घडू देणार नसल्याचा इशारा देत त्यांनी हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी या संदर्भात महापौरांनी आपली भुमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. तर ही सभागृहासाठी लाजीरवाणी गोष्ट असून लोकप्रतिनिधींना आता आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे मत गटनेते नारायण पवार यांनी व्यक्त केले. 

नगरसेवक सभागृहात बोलण्याची इच्छा असूनही बोलायला घाबरतात, आज हा प्रकार घडला नसून यापूर्वीसुध्दा अशा घटना घडल्या असून सुरवातीलाच कडक भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती असे खडे बोलही त्यांनी सुनावले. दरम्यान सभागृहात अशा पध्दतीने गोंधळ सुरु असतांनाच काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी हा महापौरांचा, सभागृहाचा आणि समस्त ठाणेकरांचा अपमान असल्याचे सांगत आयुक्तांच्या विरोधात थेट अविश्वासाचा ठराव मांडला. सायमंड गो बॅकची घोषणा देत तुमच्यात हिम्मत असेल तर हा ठराव मंजुर करा असे थेट आव्हानच त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मी विरोधात बोलतो म्हणून त्याची शिक्षा मी भोगली असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, मी कोणाला घाबरत नाही, मला नेत्याचा फोन येत नाही, त्यामुळे या ठरावाला अनुमोदन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तर यापूर्वी आमच्या बाबतीत असे प्रकार घडले होते, परंतु, त्यावेळेस कोणीही साथ दिली नाही. तेव्हा साथ दिली असती तर आज ही वेळ आली नसती अशी भूमिका भाजपच्या नगरसेविका अर्चना मणोरा, नंदा पाटील यांनी मांडली. तर यापूर्वी प्रशासनाच्या विरोधात भुमिका घेतली म्हणून माङयावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुध्दा झाल्याचा गौप्यस्फोटही भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केला. यापूर्वी सुद्दा असे प्रकार घडले आहेत. मात्र, आजही आपण एकत्र नाही, केवळ पक्षीय राजकारणात गुंतलो आहोत, आपल्यावर आपला विश्वास राहिलेला नाही. निषेध नोंदवितांनाही गोड बोलून निषेध नोंदविला जात आहे, आपण आज बोललो तर उद्या आपल्यावरही गुन्हा दाखल होईल याची भिती मनात बाळगून आहोत, आपण बोलले तर बजेट मिळणार नाही याचीही भिती आहे, पण बजेट आज मिळाले नाही तर ते उद्या मिळणारच आहे अशा काही मुद्यांना हात घालत पाटणकर यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे आजतरी खंबीर निर्णय घ्या अशी मागणी केली.

विरोधक प्रशासनाविरोधात बोलत असतांना शिवसेनेची कोंडी होत होती. परंतु त्या विरोधात बोलण्यास कोणच पुढे सरसावत नव्हता. अखेर माजी महापौर शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी माङो नगरसेवक पद गेले तरी चालेल मात्र चव्हाण यांनी मांडलेल्या या ठरावाला मी अनुमोदन देत असल्याची ठाम भुमिका घेत शिवसेनेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर हा केवळ महापौरांचा अपमान नसून सभागृहाचा अपमान असल्याचे मत भाजपचे नगरसेवक अशोक राऊळ यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचार हा आमचा जन्मसिध्द हक्क असल्याप्रमाणो प्रशासनातील मंडळी वागत आहेत, त्यामुळे त्यांना लगाम घातला गेलाच पाहिजे असे मत व्यक्त करीत त्यांनीही चव्हाण यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन दिले. 

दोन वर्षापूर्वीच ही भुमिका घ्यायला हवी होती - महापौरआज अधिकारी गैरहजर राहिले म्हणून तुम्ही सगळे प्रशासनाच्या विरोधात बोलत आहात, आजची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही असे प्रकार घडले होते, त्यावेळेसच मी तुम्हाला सांगत होते, सत्ताधारी पक्षात असतांनाही वेळप्रसंगी मी विरोधी बाकावरील नगरसेवकांच्या बाजूनेही बोलली. मात्र एवढे करुनही तुम्ही आयुक्तांच्या गळ्यात गळा घालत असाल तर मी कशाला बोलू असे खडे बोल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्व पक्षीय नगरसेवकांना सुनावले. प्रशासनाकडून आणण्यात आलेल्या चोरीच्या प्रस्तावांना विरोध झालाच म्हणूनच आज ही मंडळी गैरहजर राहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. तुम्ही केलेल्या चो:या नगरसेवकांच्या माथी मारता हे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तडजोड करण्यासाठी महापौर म्हणून मी कधीही आयुक्तांच्या दालनात गेलेली नाही, मी माङया मतावर आजही ठाम आहे. यापूर्वीच जर प्रशासनाला अद्दल घडविली असती तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती, आपणच ही वेळ आपल्यावर ओढावून घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्ही तुमची जागा निश्चित करा, तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा असे सांगतांनाच अविश्वास ठरावासंदर्भात विशेष महासभा लावली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

इतर कामांमुळे महासभेला दांडीएकच महासभा पाच पाच दिवस सुरु राहत असल्याने त्याठिकाणी एकाच वेळेस 18 हून अधिकारी अडकून राहत आहेत. त्यात महासभा वेळेत सुरु होत नाही, प्रस्ताव मार्गी लावले जात नाहीत. शिवाय आता येत्या काही दिवसांवर गणोशोत्सव आला आहे, त्यामुळे रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविणो आदींसह इतरही कामे महत्वाची असल्याने महासभेला अधिका:यांना दांडी मारल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना